मुंबई - भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. प्राण्यांशी क्रूरपणे वागणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती त्याने पत्राद्वारे केली आहे.
प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या PETA या संस्थेने ही माहिती समोर आणली आहे. चहलने त्याच्या पत्रात प्राण्यांसाठी असलेले कलम १९६० याचा उल्लेख केला आहे. या कलमानुसार प्रथम दोषी व्यक्तीला ५० रुपये दंडाची शिक्षा आहे आणि ही शिक्षा कालबाह्य झालेली असल्याचे चहलने नमूद केले आहे, अशी माहिती PETAने दिली.