नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा हिस्सा आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. अशातच फिरकीपटू चहलने भारतीय चाहत्यांसाठी इस्टाग्रामवर वर्ल्ड कपचे गाणं शेअर केले आहे. या व्हिडीओत चहल आगामी विश्वचषकाची तयारी करताना दिसत आहे.
'बल्ला चला, छक्का लगा...' युजवेंद्र चहलने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 'बल्ला चला, छक्का लगा... ये कप हमारा है घर लेकर आ...' हे गाणं आता चर्चेचा विषय बनले आहे. चाहते देखील कमेंटच्या माध्यमतून युझीला विश्वचषकासाठी शुभेच्छा देत आहेत.
धनश्री वर्माने धरला ठेका चहलची पत्नी धनश्रीनेही हेच गाणं तिच्या इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर केले आहे. मात्र धनश्रीने यामध्ये बदल केला आहे. खरं तर बॅकग्राउंडमध्ये हे वर्ल्ड कपचं गाणं तर सुरू आहे मात्र धनश्रीने यावर ठेका धरला आहे. डान्स करताना चहलच्या पत्नीने भारतीय संघाची जर्सी परिधान केली आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. नेदरलॅंड, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"