ZIM vs IND 2022: झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी भारताला धक्का; अष्टपैलू खेळाडूच्या डाव्या खांद्याला दुखापत

ZIM vs IND 2022: १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 01:14 PM2022-08-11T13:14:39+5:302022-08-11T13:15:10+5:30

whatsapp join usJoin us
ZIM v IND 2022: Washington Sundar injures left shoulder ahead of Zimbabwe tour | ZIM vs IND 2022: झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी भारताला धक्का; अष्टपैलू खेळाडूच्या डाव्या खांद्याला दुखापत

ZIM vs IND 2022: झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी भारताला धक्का; अष्टपैलू खेळाडूच्या डाव्या खांद्याला दुखापत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ZIM vs IND 2022: १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्यामुळे तो झिम्बाब्वे दौऱ्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयपीएल २०२२मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना वॉशिंग्टनला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो बऱ्याच मालिकांना मुकला. २२ वर्षीय वॉशिंग्टनची झिम्बाब्वे दौऱ्यावरील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटमध्ये लँसेशायर क्लबकडून खेळत होता आणि एका सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली.

कौंटी चॅम्पियनशीपमध्ये लँसेशायर क्लबकडून ५२ धावा व ८ विकेट्स घेतल्या. त्यानंतर वन डे कप स्पर्धेत दोन सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या. पण, एका सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि आता तो उर्वरित सामने खेळणार नाही. लँसेशायर क्लबने ट्विट करून ही माहिती दिली. फेब्रुवारी २०२२पासून वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. 



भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर
 

Web Title: ZIM v IND 2022: Washington Sundar injures left shoulder ahead of Zimbabwe tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.