भारत-श्रीलंका, टीम इंडिया-कौंटी एकादश असे सामने सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका सामन्याची चर्चा सुरू आहे. मंगळवारचा दिवस हा क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी घेऊनच आला आहे. टीम इंडियाच्या दोन सामन्यांसह तामिळनाडू प्रीमिअर लीग, इंग्लंड-पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया या सामन्यांची मेजवानी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश यांच्यात तिसरा वन डे सामना खेळवला जात आहे आणि त्यात बांगलादेश संघानं जबरदस्त कमबॅक केले आहे. झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करताना २९८ धावा केल्या आहेत.
बंगालच्या क्रिकेट संघातून खेळणार क्रीडा मंत्री; ३९ जणांच्या सराव शिबारात घेणार भाग!
बांगलादेशनं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या झिम्बाब्वेला साजेशी सुरुवात करता आली नाही. ताडीवानशे मरुमानी ( ८) याला शाकिब अल हसन यानं पायचीत केलं. त्यानंतर कर्णधार ब्रेंडन टेलर ( २८), डिओन मायरस ( ३४) यांनी मधल्या फळीत चांगला खेळ केला. सलामीवीर रेगीस चकाब्वा यानं ९१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ८४ धावा केल्या. सिकंदर रझा ( ५७) व रायन बुरी ( ५९) यांनीही अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावसंख्येत भर घातली. या दोघांनी ५ बाद १७२ वरून संघाला २८४ धावांपर्यंत मजल मारून दिली.
२८४ धावांवर ही जोडी तुटली. मुश्ताफिजूर रहमाननं सिकंदरला बाद केले. त्यानंतर ४९व्या षटकात मोहम्मद सैफुद्दीननं तीन विकेट्स घेतल्या अन् १६ चेंडूंत १४ धावांची भर घालून झिम्बाब्वेचे ५ फलंदाज माघारी परतले. सैफुद्दीन व रहमान यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.