ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? साई सुदर्शनचे पदार्पण

ZIM vs IND 2nd T20I Live : आज भारत आणि झिम्ब्बावे यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 03:34 PM2024-07-07T15:34:47+5:302024-07-07T16:06:15+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs IND 2nd T20I Match Live Updates India won the toss and Elected to Bat first | ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? साई सुदर्शनचे पदार्पण

ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? साई सुदर्शनचे पदार्पण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ZIM vs IND 2nd T20I Match Live Updates | हरारे : झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारताच्या युवा ब्रिगेडला सलामीच्या सामन्यात १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. शुबमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघ पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी झिम्बाब्बे दौऱ्यावर आहे. आज या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना जिंकून यजमानांनी विजयी सलामी दिली आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधणार का हे पाहण्याजोगे असेल. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवले जात आहेत. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून साई सुदर्शन भारतीय संघात पदार्पण करत आहे.  

भारतीय संघ - 

शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन (पदार्पण), रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

झिम्बाब्वेचा संघ -

सिकंदर रझा (कर्णधार), तदीवानाशे मारूमानी, इनोसेंट कॅया, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जॉनथन कँपबेल, क्लाइव्ह मंडे, वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजारबानी, तेंदई चतारा.

दरम्यान, पहिल्या सामन्यात ११६ धावांच्या सोप्या धावांचा पाठलाग करताना भारताला अपयश आले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ ची स्पर्धा खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यातून अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी टीम इंडियाचे तिकीट मिळवले. 

Web Title: ZIM vs IND 2nd T20I Match Live Updates India won the toss and Elected to Bat first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.