ZIM vs IND Live : भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; भारताने २ बदल केले, ऋतुराज बाकावर

ZIM vs IND 5th T20 Live Match Updates : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाचवा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 04:08 PM2024-07-14T16:08:34+5:302024-07-14T16:08:38+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs IND 5th T20 Live Match Updates Zimbabwe won the toss and Elected to Bowl, Mukesh Kumar and Riyan Parag are playing today for India | ZIM vs IND Live : भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; भारताने २ बदल केले, ऋतुराज बाकावर

ZIM vs IND Live : भारतासाठी 'सराव' तर झिम्बाब्वेची अस्तित्वाची लढाई; भारताने २ बदल केले, ऋतुराज बाकावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ZIM vs IND 5th T20 Live Match Updates । हरारे : अखेरच्या ट्वेंंटी-२० सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियाने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना म्हणजे भारतीय संघासाठी केवळ सराव आहे. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुकेश कुमार आणि रियान पराग यांना आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने प्रथमच मालिका जिंकली. आजचा सामना केवळ औपचारिकता असल्याने भारताने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. ऋतुराज गायकवाडला आजच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. 

मालिकेतील सलामीचा सामना जिंकून यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर विजयाची हॅटट्रिक मारून भारताने मालिका खिशात घातली. अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावण्याची किमया साधली. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, मुकेश कुमार. 

Web Title: ZIM vs IND 5th T20 Live Match Updates Zimbabwe won the toss and Elected to Bowl, Mukesh Kumar and Riyan Parag are playing today for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.