Join us  

ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! झिम्बाब्वेसाठी 'करा किंवा मरा', अखेर मराठमोळ्या खेळाडूचे पदार्पण

ZIM vs IND Live 4th T20 Match Live : आज झिम्बाब्वे आणि भारत यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 4:05 PM

Open in App

ZIM vs IND Live 4th T20 Match Live Updates | हरारे : पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना जिंकून विजयी आघाडी घेण्यासाठी आज भारतीय संघ आज मैदानात आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना जिंकून टीम इंडियाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना यजमान झिम्बाब्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे हा सामना खेळवला जात आहे. आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यात भारताच्या युवा ब्रिगेडला यश मिळते का हे पाहण्याजोगे असेल. तर सिकंदर रझाच्या नेतृत्वातील झिम्बाब्वेसाठी आजची लढत म्हणजे 'करा किंवा मरा' अशी आहे. कारण आजचा पराभव त्यांच्या हातून मालिका हिसकावेल. आजच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

आजच्या सामन्यातून मराठमोळा खेळाडू तुषार देशपांडे भारतीय संघात पदार्पण करत आहे. आवेश खानच्या जागी त्याला संधी मिळाली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी चमकदार कामगिरी करून तुषारने भारताच्या राष्ट्रीय संघात जागा मिळवली. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.

झिम्बाब्वेचा संघ -सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझरबानी, तेंडाई चतारा.

टॅग्स :भारत-झिम्बाब्वेटी-20 क्रिकेट