ZIM vs IND 4th T20 : भारताची विजयी आघाडी! झिम्बाब्वेला गिल-जैस्वालच बास; २८ चेंडू राखून सामना जिंकला

ZIM vs IND Live 4th T20 Match : टीम इंडियाने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 07:10 PM2024-07-13T19:10:00+5:302024-07-13T19:24:15+5:30

whatsapp join usJoin us
ZIM vs IND Live 4th T20 Match Live Updates Team India won by 10 wickets to take a 3-1 lead, Shubman Gill and Yashasvi Jaiswal did well | ZIM vs IND 4th T20 : भारताची विजयी आघाडी! झिम्बाब्वेला गिल-जैस्वालच बास; २८ चेंडू राखून सामना जिंकला

ZIM vs IND 4th T20 : भारताची विजयी आघाडी! झिम्बाब्वेला गिल-जैस्वालच बास; २८ चेंडू राखून सामना जिंकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ZIM vs IND Live 4th T20 Match Live Updates | हरारे : चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मोठा विजय मिळवून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. झिम्बाब्वेने दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाला भारतीय सलामीवीर पुरून उरले. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलच्या स्फोटक खेळीने भारताला विजय मिळवून दिला. यशस्वी अन् शुबमनच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने अवघ्या १५.२ षटकांत सामना जिंकला. टीम इंडियाने १० गडी आणि २८ चेंडू राखून चौथा सामना जिंकला.

यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल या जोडीने आव्हानाचा सहज पाठलाग केला. यशस्वी जैस्वालने २ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने ५३ चेंडूत नाबाद ९३ धावा केल्या, तर शुबमन गिलने २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूत नाबाद ५८ धावा कुटल्या. अखेर भारताने १५.२ षटकांत एकही गडी न गमावता १५६ धावा करून विजयी आघाडी घेतली.

तत्पुर्वी, भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवात चांगली झाली पण सलामीवीर तंबूत परतताच झिम्बाब्वेच्या डावाला ब्रेक लागला. त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी नोंदवली. मग भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत सांघिक खेळी केली. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक धावा करून आपल्या संघाची धावसंख्या १५० पार पोहोचवली. पण भारताचा पदार्पणवीर तुषार देशपांडे प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात यश मिळवले. अखेर झिम्बाब्वेने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या. सिकंदर रझाने सर्वाधिक धावा करताना ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ४६ धावा केल्या. याशिवाय वेस्ली मधवेरे (२५) आणि तदिवनाशे मारुमणीने (३२) धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करताना खलील अहमद (२), तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

भारतीय संघ - 
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.

झिम्बाब्वेचा संघ -
सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझरबानी, तेंडाई चतारा. 

Web Title: ZIM vs IND Live 4th T20 Match Live Updates Team India won by 10 wickets to take a 3-1 lead, Shubman Gill and Yashasvi Jaiswal did well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.