ZIM vs IND Live 4th T20 Match Live Updates | हरारे : चौथ्या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात झिम्बाब्वेला यश आले. भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवात चांगली झाली पण सलामीवीर तंबूत परतताच झिम्बाब्वेच्या डावाला ब्रेक लागला. त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी नोंदवली. मग भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत सांघिक खेळी केली. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक धावा करून आपल्या संघाची धावसंख्या १५० पार पोहोचवली. पण भारताचा पदार्पणवीर तुषार देशपांडे प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात यश मिळवले.
अखेर झिम्बाब्वेने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या. सिकंदर रझाने सर्वाधिक धावा करताना ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ४६ धावा केल्या. याशिवाय वेस्ली मधवेरे (२५) आणि तदिवनाशे मारुमणीने (३२) धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करताना खलील अहमद (२), तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
आजचा सामना यजमान झिम्बाब्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे हा सामना खेळवला जात आहे. आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यात भारताच्या युवा ब्रिगेडला यश मिळते का हे पाहण्याजोगे असेल. तर सिकंदर रझाच्या नेतृत्वातील झिम्बाब्वेसाठी आजची लढत म्हणजे 'करा किंवा मरा' अशी आहे. कारण आजचा पराभव त्यांच्या हातून मालिका हिसकावेल. या सामन्यातून मराठमोळा खेळाडू तुषार देशपांडे भारतीय संघात पदार्पण करत आहे. आवेश खानच्या जागी त्याला संधी मिळाली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी चमकदार कामगिरी करून तुषारने भारताच्या राष्ट्रीय संघात जागा मिळवली. त्याने त्याच्या ३ षटकांत ३० धावा देत एक बळी घेतला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद.
झिम्बाब्वेचा संघ -सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधवेरे, तदिवनाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदंडे, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझरबानी, तेंडाई चतारा.