ठळक मुद्देवडीलांकडून हा वारसा त्याच्यासह भाऊ टॉम आणि बेन यांनी घेतला. टॉमने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत सॅमने इंग्लंड संघात एंट्री केली.
स्वदेश घाणेकर : इंग्लंड संघाने कसोटी संघ जाहीर केला, त्यावेळी प्रत्येक जण आदिल रशीदचे नाव लिस्टमध्ये हुडकू लागले. पण याच शोधाशोधीत सॅम कुरन हे अपरिचित नाव समोर आले. भारताच्या दिग्गज फलंदाजाना रोखाण्यासाठी २० वर्षीय गोलंदाजाला पाचारण कराण्याची कल्पना त्यांना का सुचली, या प्रश्नाने हसू येत होते. पण याच कुरनने भारतीयांना मेटाकुटीला आणले. झिम्बाब्वे ते इंग्लंड क्रिकेट असा दूरचा प्रवास करून कुरनने राष्ट्रीय संघात हे स्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याचा संघर्ष नरजअंदाज करून चालणार नाही.
इंग्लंड कसोटीपूर्वीच्या सराव सामन्यात मिसुरडेही न आलेल्या कुरनने भारताचे सहा फलंदाज बाद केले होते, याची आठवण करून देणे महत्वाचे.. त्यामुळेच जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या अनुभवी गोलंदाजाच्या साथीला कुरनला संधी मिळाली. क्रिकेटचे बाळकडू त्यला घरातच मिळाले. वडील केव्हिन कुरन हे झिम्बाब्वेचे सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक होते. वडीलांकडून हा वारसा त्याच्यासह भाऊ टॉम आणि बेन यांनी घेतला. टॉमने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत सॅमने इंग्लंड संघात एंट्री केली.
३ जून १९९८ ला जन्मलेल्या सॅमने भारताला पहिल्या डावात चार धक्के दिले,तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करून परफेक्ट अष्टपैलू असल्याचे सिद्ध केले.सॅमच शिक्षण हरारे येथे झाले. आपल्या कुटुंबीयांसह रुसापे येथे राहत होता, परंतु २००४ च्या लॅंड रिफॉर्म पॉलिसीमध्ये कुरन कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन गेली. या कठीण प्रसंगी कुरन कुटुंबीय रुसापे येथेच राहिले. सॅमने २०१२-१३ च्या हंगामात झिम्बाब्वेच्या १३ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण त्याला इंग्लंड खुणावत होते.
तीन वर्षांनी तो दिवस उजाडला...
२०१६ मध्ये त्याला ती संधी मिळाली. येथील सरे क्लबकडून खेळताना सॅमने इंग्लंडच्या संघाचे दार ठोठावले. २०१६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्याची इंग्लंड संघात निवड झाली. त्याने सहा सामन्यात २०१ धावा केल्या आणि ७ विकेट घेतल्या. त्यानंतर इंग्लंड लायन्स संघासोबत सयुंक्त अरब इमिरातीचा दौरा आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात स्थान...जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या तिरंगी वन डे मालिकेत त्याची निवड झाली.. पण त्याला ही मालिका बाकावर बसूनच पाहावी लागली.
बेन स्टोक्सची दुखापत सॅमच्या पथ्यावर...
३० मे २०१८ मध्ये पाकिस्तान विरूध्दच्या दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्सला दुखापतीमुळे इंग्लंड संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. यामुळेच सॅमला संधी मिळाली. १ जूनला सॅमने कसोटीत पदार्पण केले आणि शाबाद खान हा त्याचा पहिला बळी.
विक्रमांना गवसणी
भारताविरुद्धच्या पहिल्याच डावात चार विकेट घेणाऱ्या सर्वात युवा इंग्लिश गोलंदाजाचा मान त्याने पटकावला. त्यात दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. डेनीस कॉम्पटन, जॅक क्रावफोर्ड आणि हसीब हामेद यांच्यानंतर कसोटी अर्धशतक करणारा तो ( २० वर्ष ६१ दिवस ) चौथा युवा खेळाडू ठरला.
Web Title: Zimbabwe to England ... Sam curran's Struggle Travel
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.