नवी दिल्ली : झिम्बाब्वेने टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत, 8 संघांनी आधीच पात्रता फेरी गाठली आहे. उरलेल्या आठ संघांमध्ये पहिले क्वालिफायर सामने खेळवले जातील आणि यापैकी पात्र ठरलेले चार संघ सुपर-१२ च्या फेरीत खेळतील. ३७ वर्षीय क्रेग एरविनची झिम्बाब्बेच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीचे विश्वचषकाच्या संघातून पुनरागमन केले आहे.
क्रेग एरविन सांभाळणार कर्णधारपद झिम्बाब्वेच्या संघाचा कर्णधार क्रेग एरविनने दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. हाताच्या दुखापतीमुळे बाहेर झालेला ३७ वर्षीय कर्णधार पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. खरं तर झिम्बाब्वेच्या संघातील अनेक खेळाडू दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. मात्र चकाबवा रेगिस, सिकंदर रझा आणि विलियम्स शॉन यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश असणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठी झिम्बाब्वेचा संघ क्रेग एरविन, बर्ल रेयान, चकाबवा रेगिस, चतारा तेंदाई, एव्हंस ब्रॅडली, जोंगवे ल्यूक, मदानडे क्लाईव्ह, मधिवीरे वेस्ली, मासकाडजा वेलिंग्टन, मुन्योंगा टोनी, मुजरबानी ब्लेसिंग, नागरवा रिचर्ड, सिकंदर रझा, विल्यम मिल्बा, शुम्बा मिल्टन, विलियम्स शॉन.
राखीव खेळाडू - चिवांगा टनाका, काये इनोसेंट, कासुजा केव्हिन, मारूमणी तडिवानसे, न्याउची व्हिक्टर.
टी-20 विश्वचषकात सुपर-१२ पूर्वी आठ संघांमध्ये सामने खेळवले जातील. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-12 फेरीगट 1 - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.