zimbabwe vs gambia live : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यात झिम्बाब्वेने जागितक विक्रम केला. निर्धारित २० षटकांत ४ बाद तब्बल ३४४ धावांचा डोंगर उभारुन झिम्बाब्वेच्या संघाने क्रिकेट विश्वाला धक्का दिला. गांबियाविरुद्धच्या लढतीत सिकंदर रझाने शतकी खेळी करताना १५ षटकार ठोकले. गांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने १५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४३ चेंडूत १३३ धावांची अप्रतिम खेळी केली. झिम्बाब्वेने याआधी देखील पाकिस्तानसारख्या नामांकित संघांना पराभवाची धूळ चारली आहे. सिकंदर रझा पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएलसारख्या लोकप्रिय ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळला आहे. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा (नाबाद १३३ धावा), ब्रायट बेनेट (५०), तडिवनाशे मरुमनी (६२), रयान बर्ल (२५), क्लाईव्ह मदंडेने नाबाद ५३ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेने सुरुवातीपासूनच स्फोटक सुरुवात केली. प्रत्येक गोलंदाजाला मार पडला. कर्णधार सिकंदर रझा ४३ चेंडूत १३३ धावा करून नाबाद परतला. सलामीवीर ब्रायन बेनेटच्या साथीने यष्टिरक्षक मारुमणीने अवघ्या ५.४ षटकांत धावसंख्या ९८ धावांवर नेली. दोन्ही सलामीवीर अर्धशतके झळकावून बाद झाले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार सिकंदर रझाने क्लाईव्ह मदंडेसह पाचव्या गड्यासाठी जबरदस्त भागीदारी केली. मदंडे अवघ्या १७ चेंडूत ५३ धावा करून नाबाद राहिला.
ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्या झिम्बाब्वे vs गांबिया - ३४४नेपाळ vs मंगोलिया - ३१४भारत vs बांगलादेश - २९७झिम्बाब्वे vs सेशल्स - २८६ अफगाणिस्तान vs आयर्लंड - २७८