IPL 2019 : 'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएलच्या १० हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:12 PM2019-05-11T12:12:32+5:302019-05-11T12:15:46+5:30

whatsapp join usJoin us
Ziva kisses MS Dhoni after CSK beat Delhi Capitals to enter 8th IPL final | IPL 2019 : 'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट

IPL 2019 : 'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएलच्या १० हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान पटकावला. चेन्नईने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयानंतर धोनीला लेक झीवाने पापा देत 'गोड' गिफ्ट दिले. CSK च्या बहुतेक खेळाडूंनी सामन्यानंतर बच्चेकंपनीसोबत धमाल मस्ती केली. चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे आणि आयपीएलचे जेतेपद चौथ्यांदा कोण पटकावतो याची उत्सुकता लागली आहे. 


आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या दिल्लीनं सामन्याच्या पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीवीरांना बाद करण्याची सोपी संधी गमावली आणि त्यांचा आत्मविश्वासही हरवला. फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. अन्य फलंदाजांनी त्यावर कळस चढवत चेन्नईला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. चेन्नईचा हा आयपीएलमधील 100 वा विजय ठरला. मुंबई इंडियन्सनंतर विजयाचे शतक पूर्ण करणारा हा दुसरा संघ ठरला. चेन्नईने 164 सामन्यांत 100 विजय मिळवले. 


कॉलीन मुन्रो आणि रिषभ पंत वगळता दिल्लीच्या फलंदाजांना समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आले. दिल्लीला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या.  पंतने 25 चेंडूंत 38 धावा केल्या. त्यात 2 चौकार व 1 षटकार खेचला. चेन्नईकडून दीपक चहर, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग आणि ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दिल्लीला CSK ला पहिल्याच षटकात धक्का देण्याची संधी चालून आली होती. परंतु गचाळ क्षेत्ररक्षणामुळे चेन्नईला जीवदान मिळाले.


त्याचा फायदा उचलत शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. फॅफने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफचे हे यंदाच्या सत्रातील तिसरे आणि एकूण आयपीएलमधील 12वे अर्धशतक ठरले.  फॅफने 7 चौकार व 1 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. वॉटसननेही  31 चेंडूंत 50 धावा केल्या. 50 धावांच्या खेळीत त्याने 3 चौकार व 4 षटकार खेचले. त्यामुळे चेन्नईचा विजय पक्का झाला. 

 

Web Title: Ziva kisses MS Dhoni after CSK beat Delhi Capitals to enter 8th IPL final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.