वेलिंग्टन - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला फक्त दोन धावाच करता आल्या. त्यामुळे धोनीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताला तीन धक्के बसले. त्यामुळे पहिल्या डावातील २८ षटकांत भारताला उपहारापूर्वी ३ बाद ७९ अशी मजल मारता आली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये कोहली चांगल्या फॉर्मात नसल्याचे म्हटले जात आहे. कारण आतापर्यंत न्यूझीलंडच्या दौऱ्यात तरी कोहलीला लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. काही जणांच्या मते कोहलीचा हा बॅडपॅच सुरु आहे. कारण आतापर्यंत ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांत कोहलीला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटमध्ये कोहली सर्व कसर भरून काढेल, असे वाटत होते. पण कोहली फक्त दोन धावांवरच बाद झाला.
न्यूझीलंडच्या दौऱ्यावर कोहली पहिल्यांदाच कर्णधार म्हणून गेला आहे. कर्णधार म्हणून न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात पहिल्यांदा खेळताना कोहलीला दोन धावा करता आल्या. हा आतापर्यंत भारतीय कर्णधारांचा निच्चांक आहे. कारण यापूर्वी सौरव गांगुलीने न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात पहिल्यांदा खेळताना दोन धावा केल्या होत्या. नवाब पतौडी यांनी ११, सुनील गावस्कर यांनी नाबाद ३५, बिशनसिंग बेदी यांनी ३०, मोहम्मद अझरने ३०, वीरेंद्र सेहवागने २२ धावा केल्या होत्या. पण या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल स्थानावर आहे. धोनीने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा खेळताना ४७ धावा केल्या होत्या.
मयांक अगरवालला मिळाले होते जीवदान; पण त्यानंतरच झाला घात
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात २८ षटकांत ३ बाद ७९ अशी मजल मारली होती. यावेळी भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल हा चांली फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या सत्रात त्याला एक जीवदान मिळाले. पण त्यानंतर नेमके झाले तरी काय...
उपहारानंतर सातव्या षटकात मयांकला ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. बोल्टच्या या चेंडूवर मयांक स्ट्रेट ड्राइव्ह मारायला गेला. पण त्यावेळी चेंडू हवेत राहीला आणि बोल्टच्या दिशेने गेला. बोल्टने हवेत सूर मारला आणि झेल पकडायला गेला. यावेळी चेंडू बोल्टच्या हातावर बसला. पण बोल्टला तोल सांभाळता आला नाही आणि त्याच्या हातून चेंडू निसटला. यावेळी मयांकला जीवदान मिळाले.
मयांकला ३५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव घेता आली नाही. पण तिसऱ्या चेंडूवर मयांक मोठा फटका मारायला गेला आणि आपली विकेट गमावून बसला. मयांकला यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा करता आल्या.
Web Title: NZ vs IND: bad record in Virat Kohli's name; ms Dhoni is at the top of the list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.