PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

PAK vs ENG 1st Test Live : इंग्लंडने ८२३ धावांवर डाव घोषित केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 03:00 PM2024-10-10T15:00:53+5:302024-10-10T15:01:21+5:30

whatsapp join usJoin us
pak vs eng 1st test live England have finally declared the innings they lead by 267 runs in Multan | PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

pak vs eng 1st test match live updates | मुल्तानपाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सलामीचा कसोटी सामना नाना कारणांनी चर्चेत आहे. इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूक आणि जो रुट यांनी केलेली खेळी म्हणजे पाकिस्तानी चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच... ब्रूकने त्रिशतक झळकावून यजमानांना सळो की पळो करुन सोडले. त्यात रुटच्या द्विशतकी खेळीमुळे इंग्लिश संघाला ऐतिहासिक आकडा गाठता आला. इंग्लंडने ७ बाद ८२३ अशी धावसंख्या असताना डाव घोषित केला. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी सपाट खेळपट्टीचा फायदा घेत ५०० पार धावसंख्या पोहोचवली. कर्णधार शान मसूदने १५१ धावांची अप्रतिम खेळी केली. मात्र, इंग्लंडचा डाव सुरू होताच इंग्लिश संघाने शेजाऱ्यांना इतिहासाची जाणीव करुन दिली. चिवट खेळीसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश शिलेदार पाकिस्तानवर तुटून पडले. 

आज चौथ्या दिवशी इंग्लंडने २६७ धावांची आघाडी घेऊन डाव घोषित केला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने ३२२ चेंडूत २९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावा कुटल्या. तर, जो रुट (२६२), बेन डकेट (८४), जॅक क्रॉली (७८), जेमी स्मिथ (३१) आणि ख्रिस वोक्सने नाबाद १७ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाच संघर्ष करावा लागला. यजमान संघाकडून नसीम शाह आणि सैय अयुब यांनी २-२ बळी घेतले, तर शाहीन आफ्रिदी, आमिर जमाल आणि अघा सलमान यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला. 

दरम्यान, मुल्तान कसोटीत इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ७०० धावांचा आकडा गाठताच इतिहास रचला. या आधी भारतीय संघाने पाकिस्तानात पाहुणा संघ म्हणून सर्वाधिक धावा केल्या होत्या. टीम इंडियाने २००४ मध्ये ६७५ धावा करण्याची किमया साधली. पण, आता भारताचा हा विक्रम मोडण्यात इंग्लिश संघाला यश आले.

तत्पुर्वी, पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात १४९ षटकांत ५५६ धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुला शफीक (१०२), सैय अयुब (४), शान मसूद (१५१), बाबर आझम (३०), सौद शकील (८२), नसीम शाह (३३), मोहम्मद रिझवान (०), अघा सलमान (नाबाद १०४), आमिर जमाल (७), शाहीन आफ्रिदी (२६) आणि अबरार अहमदने (३) धावा केल्या. फलंदाजांना मदतशीर असलेल्या खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांनी चांगली खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर गस एटकिंसन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि जो रुट यांना १-१ बळी घेता आला.

Web Title: pak vs eng 1st test live England have finally declared the innings they lead by 267 runs in Multan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.