PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

PAK vs ENG Test Series : सात तारखेपासून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:24 PM2024-10-09T13:24:30+5:302024-10-09T13:25:49+5:30

whatsapp join usJoin us
PAK vs ENG 1st test live match updates joe root highest run scorer for england in test cricket | PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

joe root new record | मुल्तान : पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या संघाला पहिल्याच कसोटी सामन्यात संघर्ष करावा लागत आहे. यजमान पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५५६ धावांचा डोंगर उभारला. फलंदाजांना मदतशीर असलेल्या या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाज देखील लय पकडत आहेत. इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रुट आणखी एक विक्रम करण्यात यशस्वी ठरला. (Most runs for England in Test cricket) इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून रुटच्या नावाची नोंद झाली आहे. त्याने या यादीत माजी कर्णधार ॲलिस्टर कुकला मागे टाकत अव्वल स्थान गाठले. (Joe Root 5th highest run scorer in Test cricket now)

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सलामीचा कसोटी सामना मुल्तान येथे खेळवला जात आहे. या सामन्यातील आपल्या पहिल्या डावात रुटने ७१ धावा करताच नव्या विक्रमाला गवसणी घातली. कुकने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १२,४७२ धावा केल्या आहेत, तर रुटने हा जादुई आकडा गाठून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचवे स्थान पटकावले.

कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  1. सचिन तेंडुलकर - १५,९२१ धावा
  2. रिकी पाँटिग - १३,३७८ धावा
  3. जॅक कॅलिस - १३,२८९ धावा
  4. राहुल द्रविड - १३,२८८ धावा
  5. जो रुट - १२,४७३* धावा
  6. ॲलिस्टर कुक - १२,४७२ धावा
  7. कुमार संगकारा - १२,४०० धावा

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ -
ओली पोप (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स (पदार्पण), जॅक लीच, शोएब बशीर. 

पाकिस्तानचा संघ - 
शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुला शफीक, बाबर आझम, सौद शकील, नसीम शाह, मोहम्मद रिझवान, अघा सलमान, आमिर जमाल, शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद. 

Web Title: PAK vs ENG 1st test live match updates joe root highest run scorer for england in test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.