कोरोना व्हायरसच्या संकटात ब्रेक लागलेल्या क्रिकेट स्पर्धा हळुहळू पूर्वपदावर येऊ इच्छित आहेत. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) संलग्न संघटनांसोबत बैठक घेत आहे. त्यातच आशिया चषक ( ट्वेंटी-20) डोळ्यासमोर ठेवून आशियाई क्रिकेट मंडळानेही सोमवारी बैठक बोलावली होती. त्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आयसीसीचा निर्णय काय येतो, त्यानंतर आशिया चषक स्पर्धेचे भवितव्य ठरवण्यावर चर्चा झाली. यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे, पण भारतीय संघाचा तेथे जाण्यास विरोध आहे. अशात पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) आशिया चषक आयोजनाचा हट्ट सोडल्याचे वृत्त GeoSuper या वेबसाईटनं दिलं आहे.
महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत!
पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेट यांनी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा आशिया चषक हा श्रीलंके होणार असल्याचा दावा या वेबसाईटनं केला आहे. यंदा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. पण, बीसीसीआयचा त्याला विरोध आहे आणि ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत कोरोना व्हायरसच्या संकटात संयुक्त अरब अमिरातीपेक्षा श्रीलंका हा सुरक्षित पर्याय असल्याचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेटनं ठेवला.
वर्णद्वेषावर इरफान पठाणनं मांडलं परखड मत... व्हायरल होतंय ट्विट!
अन्य देशांच्या तुलनेत श्रीलंकेतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. तेथे 2000 हून कमी कोरोना रुग्ण आहेत आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त अरब अमिराती येथे 40000 रुग्ण आहेत आणि मृतांचा आकडा 281 इतका आहे. पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की,''पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची अदलाबदल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे यंदाचा आशिया चषक श्रीलंकेत होईल, तर पुढील स्पर्धेसाठी पीसीबी दावा करणार आहे.''
ICCची चार महत्त्वाच्या नियमांना मंजूरी; क्रिकेटमध्ये दिसतील 'हे' बदल
याबाबतची अधिकृत घोषणा आशियाई क्रिकेट परिषदेच्या पुढील बैठकीत होण्याची शक्यता आहे.
Web Title: Pakistan cricket board agrees to swap Asia Cup 2020 rights with Sri Lanka: report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.