ठळक मुद्देपाकिस्तानच्या 10 खेळाडूंसह 35 सपोर्ट स्टाफ सदस्यांना झालीय कोरोनाची लागणमोहम्मद हाफिजनं स्वतंत्र चाचणी केली अन् त्याचा अहवाल आला निगेटिव्ह
कोरोना अहवालावरून सध्या पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) चर्चेत आहे. पीसीबीनं मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात आणखी 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यात मोहम्मद हाफिज याचाही समावेश होता. पण, पाकिस्तानच्या या अनुभवी खेळाडूनं पीसीबीला मोठा दणकाच दिला. त्यानं खासजी केंद्रात चाचणी केली आणि त्यात त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. हाफिजनं ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून पीसीबी विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. पीसीबीला त्याचं हे वागणं आवडलं नसलं तरी त्यांचं डोकं टाळ्यावर नक्की आलं आणि त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video
पीसीबीने मंगळवारी त्यांचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असलेले जाहीर केलं. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यानुसार आतापर्यंत 29 पैकी 10 खेळाडूंना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंनंतर फाखर जमान, इम्रान खान, कशीफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वाहब रियाझ यांना कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
पीसीबीनं जाहीर केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंपैकी मोहम्मद हाफिजनं पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं त्यानं सोशल मीडियावरून जाहीर केले. त्यानं लिहिलं की,''पीसीबीच्या अहवालानंतर मी स्वतःच्या समाधानासाठी खासगी केंद्रात चाचणी केली. माझ्या कुटुंबीयांचीही चाचणी मी करून घेतली आणि त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.''
पीसीबीनं गुरुवारी राखीव खेळाडूंचा आहवाल जाहीर केला आणि त्यांपैकी कोणालाच कोरोना झालेला नाही. हाफिजच्या दणक्यानंतर पीसीबीनं कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व 10 खेळाडूंची पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी या सर्वांचे अहवाल जाहीर करणार असल्याचे पीसीबीनं स्पष्ट केले
Web Title: Pakistan Cricket Board conducts third round of COVID-19 tests, all outcomes on Saturday
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.