पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला शुक्रवारी (22 मे) भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं हे विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं असून यामध्ये तब्बल 97 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण यातून वाचले असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीनं थेट घटनास्थळी भेट दिली. पण, त्याची ही कृती पाकिस्तानातील फॅन्सनाच आवडली नाही आणि त्यांनी क्रिकेटपटूचा समाचार घेतला.
पीआयएचे हे विमान कॅप्टन सज्जाद गुल उडवत होते. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यादरम्यान, एअर ट्राफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील अखेरच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगदेखील समोर आलं आहे. शाहिद आफ्रिदीनं घटनास्थळी भेट दिली. यावेळी नेटिझन्सनी त्याला प्रसिद्धीचा भुकेला म्हणून सुनावलं.
एअरबस ए320च्या पायलटचे रेकॉर्ड झालेले अखेरचे शब्द "विमानाचे इंजिन काम करत नाही," असे होते. त्यानंतर आता या विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. लाहोरहून कराचीला जाणारे हे विमान पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआईए) होते. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!
15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन
इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video
सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव
Web Title: Pakistan Plane Crash : Shahid Afridi Visits PIA Plane Crash Site, Pakistan Fans Slam Cricketer svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.