विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा

शान मसूदने त्याचा सहकारी अब्दुला शफीकची पाठराखण करताना एक अजब विधान केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 05:49 PM2024-10-01T17:49:09+5:302024-10-01T17:52:04+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Test captain Shan Masood said that Shan Masood's record is better than Virat Kohli's  | विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा

विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार शान मसूदने त्याचा सहकारी अब्दुला शफीकची पाठराखण करताना एक अजब विधान केले. विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचे आकडे चांगले असल्याचे त्याने सांगितले. एका पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानच्या कर्णधाराने हा दावा केला. मसूदच्या नेतृत्वात पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण, या मालिकेला सुरुवात होण्याआधी निवडकर्ता मोहम्मद युसूफने राजीनामा दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. 

पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंमध्ये अद्याप वाद असल्याचे दिसते. अजूनही जवळच्या लोकांनाच संधी दिली जातेय याबद्दल काय सांगशील? या प्रश्नावर शान मसूद म्हणाला की, हा प्रश्न योग्य आहे असे मला वाटत नाही. २०२४ मध्ये पाकिस्तानने चांगले क्रिकेट खेळले नाही हे मला ठाऊक आहे. सगळेजण आकडेवारीबद्दल भाष्य करत असतात. एके दिवशी मी याबद्दल अभ्यास केला असता, अब्दुला शफीकने १९ कसोटी सामने खेळले असून, त्याचे आकडे विराट कोहलीपेक्षा चांगले आहेत. खरे तर अब्दुला शफीकच्या तुलनेत १९ कसोटी सामन्यांपर्यंत विराट कोहलीने ४ डाव कमी खेळले आहेत. 

१९ कसोटीनंतर... 
विराट कोहली
- ३२ डाव, ११७८ धावा, ४०.६२ सरासरी, ४ शतके, ६ अर्धशतके
अब्दुला शफीक - ३६ डाव, १३७२ धावा, ४०.३५ सरासरी, ४ शतके, ५ अर्धशतके

PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक 
७-११ ऑक्टोबर, मुल्तान
१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान
२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी

पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -
शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.

Web Title: Pakistan Test captain Shan Masood said that Shan Masood's record is better than Virat Kohli's 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.