पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) शुक्रवारी त्यांचे वार्षिक करार जाहीर केले. २०२१-२२ या वर्षाच्या करारात पीसीबीनं २० पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. विशेष म्हणजे पीसीबीनं यंदा उदयोन्मुख खेळाडू हा नवा गट तयार केला असून त्यात तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम, निवड समिती प्रमुख मुहम्मद वासीम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे संचालक झाकीर खान आणि हाय परफॉर्मन्स डायरेक्टर नदीम खान हेही या बैठकीत उपस्थित होते. CEO वासीम खान यांनी सांगितले की, सर्व खेळाडूंना समान मॅच फी दिली जाणार आहे. त्यामुळे वेतन श्रेणी ते कोणत्याही गटात असले तरी मॅच फीमध्ये त्यांना समान मानधन दिले जाईल.
पीसीबीनं १ जुलै २०२१ ते ३० जून २०२२ पर्यंतचा हा करार जाहीर केला आहे. हसन अली आणि मोहम्मद रिझवान यांना अ गटात बढती मिळाली आहे, तर इम्रान बट, शाहनवाझ दहानी आणि उस्मान कादीर यांची Emerging श्रेणीत निवड झाली आहे.
- अ श्रेणी ( १.२ कोटी) - बाबर आझम, हसन अली, मोहम्मद रिझवान आणि शाहिन शाह आफ्रिदी
- ब श्रेणी ( ६५ लाख) - अझर अली, फहीम अश्रफ, फाखर जमान, फवाद आलम, शाबाद खान
- क श्रेणी ( ५० लाख) - आबीद अली, इमाम-उल-हक, हरीस रौफ, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाझ, नौमन अली, सर्फराज अहमद
यातुलनेत बीसीसीआयकडून ग्रेड A+ मधील खेळाडूला वर्षाला 7 कोटी, ग्रेड A साठी 5 कोटी , ग्रेड B मधील खेळाडूला 3 आणि ग्रेड Cमधील खेळाडूला 1 कोटी पगार दिला जातो.
Web Title: PCB announces men’s central contracts for fiscal year 2021-22, know the difference between BCCI Central Contracts
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.