Cricket Buzz»फोटो गॅलरी »'या' 10 जबदरस्त रेकॉर्डमुळे धो धो धोनीला मानतात 'थलैवा.. द बॉस'; कुठला आहे सगळ्यात भारी?'या' 10 जबदरस्त रेकॉर्डमुळे धो धो धोनीला मानतात 'थलैवा.. द बॉस'; कुठला आहे सगळ्यात भारी? By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 5:23 PMOpen in App1 / 102008 साली इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात झाली. मुंबई इंडियन्सच्या नावावर सर्वाधिक जेतेपद असली तरी चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा विक्रम आहे. पण, आयपीएलच्या फायनलमध्ये सर्वाधिक वेळा खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्यानं 12 पैकी 9 आयपीएल फायनल्समध्ये खेळण्याचा पराक्रम केला आहे. 2017मध्ये तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून अंतिम फेरीत खेळला होता.2 / 10ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धोनीनं स्वतःला मॅच विनर म्हणून सिद्ध केले आहे आणि त्याचे सामना फिनिश करण्याचे कौशल्य कुणालाही जमणारे नाही. आयपीएलमध्ये तो सर्वाधिक 65 वेळा नाबाद राहिलेला आहे.3 / 10आयपीएलमध्ये सर्वाधिक 209 षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रमही महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे.4 / 10आयपीएलमध्ये सर्वाधिक 190 सामन्यांत संघाचे नेतृत्व सांभाळणारा तो एकमेव कर्णधार आहे.5 / 10मॅन ऑफ दी मॅच चा पुरस्कार पटकावणे हे प्रत्येक युवकाचे स्वप्न असते. यातही धोनी आघाडीवर आहे. त्यानं आयपीएलमध्ये 17 वेळा हा मान पटकावला आहे.6 / 10पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीनं 64 डावांत 1803 धावा केल्या आहेत.7 / 10धोनीनं 3, 4, 5, 6 आणइ 7 क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकं झळकावली आहेत.8 / 10आयपीएलच्या प्रत्येक मोसमात किमान 280 धावा करण्याची सरासरी धोनीनं कायम राखली आहे.9 / 10यष्टिंमागे धोनीनं 194 सामन्यांत 133 विकेट्स घेतल्या आहेत. एक फलंदाज बाद करण्याची त्याची सरासरी ही 0.72 इतकी आहे.10 / 10कर्णधार म्हणून धोनीनं 174 सामन्यांत सर्वाधित 104 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे आणि म्हणूनच त्याला थाला म्हटलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications