भारतासाठी खेळायचं हे माझं एकमेव लक्ष्य होतं आणि तो दिवस येणारच याची मला खात्री होती.
लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली तर त्यांना तुम्ही मैलाचे दगड बनवा.
मी आणखी चांगली कामगिरी कशी करीन आणखी चांगला बॅट्समन कसा होईन याचाच सतत विचार करत असतो.
कसं वागावं हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. ते अत्यंत शांत होते त्यांना मी कधी चिडलेलं बघितलं नाही हे फारच वैशिष्ट्यपूर्ण होतं.
मी माझी तुलना कधीही कुणाशीही केली नाही.
सचिन हा ग्रेट क्रिकेटर आहे यापेक्षा सचिन हा माणूस म्हणून खूप चांगला आहे हे ऐकायला मला जास्त आवडेल.
पराभवाचा मला तिटकारा आहे. मी मैदानात उतरतो ते जिंकण्यासाठीच.
टीकाकारांकडून मी क्रिकेटचे धडे घेतलेले नाहीत. माझं मन आणि तन कुठे असतं हे टीकाकार नाही सांगू शकत.
कुठल्याही खेळाडूचं लक्ष नेहमी आपल्या ध्येयावर केंद्रीत हवं. माझ्यासाठी क्रिकेट हे सर्वस्व आहे बाकी सगळं नंतर येतं.
24 एप्रिल... आज सचिनचा वाढदिवस. त्यानिमित्त सचिनचे 10 प्रेरणादायी विचार... स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका कारण स्वप्नं खरी होतात.