Join us  

IPLचे 12 पर्व अन् 12 वाद; कॅप्टन कूल MS Dhoni लाही आला होता राग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 8:38 PM

Open in App
1 / 14

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020 ) 13व्या पर्वाच्या पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) भिडणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे यंदाचा आयपीएल ( Indian Premier League) UAEमध्ये खेळवण्यात येत आहे.

2 / 14

आयपीएल ( IPL) म्हटलं की तिथे वाद ( Controversy in IPL) आलेच. पण, मागील मोसमात असं काही झालं होतं, की ज्यामुळे कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचाही ( MS Dhoni) पारा चढला होता. चला तर मग जाणून घेऊया 'IPLचे 12 पर्व अन् 12 वाद'! ( 12 Controversy in IPL).

3 / 14

हरभजन सिंग ( Harbhajan Singh) आणि एस श्रीसंथ ( S Sreesanth) यांच्या वादानं आयपीएलचे पहिले पर्व गाजवले. मुंबई इंडियन्‍स ( MI) आणि किंग्‍स इलेव्‍हन पंजाब ( KXIP) यांच्‍यात झालेल्‍या सामन्‍यानंतर श्रीसंतला अचानक रडताना दाखविण्‍यात आले. काय झाले कोणालाच कळेना. अखेर काही वेळाने प्रकरण समोर आले. श्रीसंत हरभजनला विनोदामध्‍ये काहीतरी बोलला. परंतु, हा विनोद हरभजनला काही सहन झाला नाही. त्‍याने त्‍याच्‍या कानाखाली लगावून दिली. 12 वर्षानंतरही हा वाद चर्चेत आहे. हा संपूर्ण प्रकार खूप गाजला होता.

4 / 14

470 करोडच्या घोटाळ्याच्या आरोपात एप्रिल 2010 मध्ये ललित मोदी यांना आयपीएलच्या कमिश्नर पदावरून काढून टाकलं होतं. त्याचप्रमाणे मॅच फिक्सिंगच्या बाबतीत देखील त्यांच नाव चर्चेत होतं. या साऱ्या प्रकरणांमुळे ललित मोदी यांची आयपीएलमधून हकलपट्टी करण्यात आली.

5 / 14

दक्षिण आफ्रिकेच्‍या एका चिअरलिडरने ब्‍लॉगमधून आयपीएलच्‍या पार्ट्यांमध्‍ये होणा-या मस्‍तीचे वास्‍तव बाहेर काढले होते. गॅब्रिएला पोस्‍कलेटो नावाच्‍या या चिअरलिडरने ब्‍लॉगमध्‍ये लिहीले होते की, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आमच्‍याकडे चालत्‍याफिरत्‍या वेश्‍या म्‍हणून बघतात. ते फक्त आम्‍हाला बेडरुममध्‍ये नेण्‍यासाठी इच्‍छुक असतात. गॅब्रिएलाने भारतीय खेळाडूंना सभ्‍य म्‍हटले होते. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथबाबत प्रचंड वादग्रस्‍त वक्तव्‍य केले होते.

6 / 14

सप्टेंबर 2011 मध्ये बीसीसीआयने आयपीएल 5 पासून कोच्ची टस्कर्स टिमला निलंबित केलं. कोच्ची संघाने बीसीसीआयला वर्षाला दिल्या जाणारा पैसा वेळेत न दिल्यामुळे निलंबित करण्यात आले. हा निर्णय घेण्यापूर्वी बीसीसीआयने कोच्ची टस्कर्सला कोणतीही नोटिस बजावली नव्हती.

7 / 14

14 मार्च 2012 मध्ये एका टिव्ही चॅनलने स्टिंग ऑपरेशन करून आयपीएलचे 5 क्रिकेटर स्पॉट फिक्सिंग आणि पैशात अडकले असल्याचं त्यांनी दाखवलं. हे खेळाडू होते किंग्स इलेवन पंजाबचे शलभ श्रीवास्तव, डेक्कन चार्जर्सचे के टी सुधींद्र, पुणे वॉरियर्सचे मोहनीश मिश्रा, हिमाचल प्रदेशचे रणजी खेळाडू अभिनव बाली आणि किंग्स इलेवन पंजाबचे अमित यादव यांच्या नावाचा समावेश होता.

8 / 14

कोलकाता नाइट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) मालक शाहरुख खान 2012मध्ये एका मोठ्या वादात अडकला. मुंबई इंडियन्‍सचा ( MI) कोलकात्‍यासोबत सामना झाल्‍यानंतर त्‍याचा वानखेडे स्‍टेडियमच्‍या सुरक्षा रक्षकांसोबत जोरदार वाद झाला. सुरक्षा रक्षकांनी मुलांसोबत गैरवर्तणूक केल्‍याचा आरोप शाहरुखने केला होता. परंतु, याप्रकरणी शाहरुखवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने 5 वर्षांची बंदी घातली होती.

9 / 14

2013 मध्ये राजस्थान रॉयल्स च्या तीन खेळाडूंवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामध्ये एस श्रीसंत, अजीत चंदीला आणि अंकित चव्हाण याचा समावेश आहे.त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर अजीवन बंदी घालण्यात आली. 21 मे 2013 मध्ये बॉलिवूड कलाकार विंदू दारा सिंह सट्टेबाजसोबत नातं असल्याचं समोर आलं होतं. या आरोपाखाली विंदू दारा सिंहला अटक देखील केली होती. २४ मेला मयप्पन मुंबई पोलिसांसमोर त्यांना हजर करण्यात आलं. पोलिसांनी चौकशी त्यांना अटक केली होती.

10 / 14

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई आणि राज्यस्थान या संघांना आयपीएलमधून निलंबित करण्यात आले. बीसीसीआयचे निलंबित अध्यक्ष श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन हे बेटिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मालकी असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीमध्ये श्रीनिवासन यांचा किती वाटा आहे याची चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.

11 / 14

2019च्या हंगामात आर अश्विनसह एमएस धोनी आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंचीही नावे आली. चिन्नास्वामी स्टेडियमवर बेंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि पंच लॉन्ग यांच्यात वाद झाला. यानंतर पंचांनी रूमचा दरवाजा तोडल्याचं प्रकरणही समोर आलं होतं.

12 / 14

पंचानी चुकीचा निर्णय देण्याची घटना बेंगळुरु आणि मुंबई यांच्यातील सामन्यावेळी घडली होती. मलिंगाने टाकलेला नो बॉल पंचांकडून दुर्लिक्षित झाला. यावेळी MIचा कर्णधार रोहित शर्मानेसुद्धा याविरोधात आवाज उठवला होता.

13 / 14

कॅप्टन कूल एम एस धोनीसुद्धा त्याच्या रागामुळे चर्चेत आला होता. त्याने मैदानात येऊन पंचांशी हुज्जत घातल्याबद्दल त्याला सामन्याच्या मानधनावर 50 टक्के रकमेचा दंड करण्यात आला होता.

14 / 14

KXIPचा कर्णधार आर अश्विनने मंकडिंग पद्धतीने RRच्या जोस बटलरला बाद केल्यानंतर बराच वाद झाला होता. यावेळी अश्विनवर अखिलाडूवृत्तीचा आरोपही करण्यात आला तर काहींनी त्याची बाजू घेतली.

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएलचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीश्रीसंतहरभजन सिंग