Join us

Women’s T20 World Cup: फॉरेनची कॅप्टन अन् तिचं गुजरातशी असणारं खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:50 IST

Open in App
1 / 8

बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातील सलामीच्या लढतीनं नवव्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्कॉटलंड महिला संघासाठी हा सामना अन् स्पर्धा एकदम खास आहे. कारण हा संघ पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

2 / 8

संघाला ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण दाखवण्यात स्कॉटिश कॅप्टन कॅथ्रिन एम्मा ब्राइस (Kathryn Bryce) हिचा महत्त्वाचा वाटा आहे. एक नजर टाकुयात या महिला खेळाडूसंदर्भातील खास गोष्टी अन् तिचे गुजरातशी असणाऱ्या खास कनेक्शनबद्दलची माहिती

3 / 8

तुम्हाला पटणार नाही, पण खेळीशिवाय आपल्या सौंदर्यानं क्रिकेट चाहत्यांना वेड लावणाऱ्या या महिला क्रिकेटरनं २०११ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी स्कॉटलंड संघाकडून पदार्पणाचा सामना खेळला होता.

4 / 8

कॅथ्रिन ब्राइस ही पहिली स्कॉटिश महिला आहे आपल्या कॉलेजमधील बॉईज प्लेइंग इलेव्हनचा भाग होती. ती टॉप ऑर्डर बॅटर आणि स्विंग बॉलर आहे.

5 / 8

२०२० मध्ये राष्ट्रीय संघाची कॅप्टन झालेली कॅथ्रिन ही २०२१ मध्ये आयसीसी रँकिंगमध्ये टॉप १० मध्ये दिसली होती. ती स्कॉटलंडची पहिली क्रिकेटर आहे जिने हा पल्ला गाठला. स्कॉटलंड पुरुष संघातीलही कोणत्या फलंदाजाला इथपर्यंत मजल मारता आलेली नाही.

6 / 8

अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कॅथ्रिन ब्राइस जूलै २०२० मध्ये इंग्लंडमधील द हंड्रेड महिला लीगमध्येही एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले होते.

7 / 8

भारतात लोकप्रिय होत असलेल्या वुमन्स प्रीमिअर (WPL) स्पर्धेत ती गुजरात टायटन्सचा भाग असल्याचे दिसून आले.

8 / 8

युएसएच्या तारा नॉरीस हिच्यानंतर WPL लिलावात बोली लागलेली ती दुसरी असोसिएट प्लेयर आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने तिला १० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकआयसीसी विश्वचषक टी-२०आयसीसीटी-20 क्रिकेटट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024