IPL 2023: 'नाम बडे और दर्शन छोटे'...फ्रँचायझींनी ३ खेळाडूंना करोडो रुपयात विकत घेतले; मात्र फलंदाजी, गोलंदाजीत मिळतंय अपयश

IPL 2023: तुम्हाला अशाच ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना मोठी किंमत तर मिळाली, मात्र चांगला खेळ दाखवण्यात ते अपयशी झाले.

इंडियन प्रीमियर लीग नेहमीच चमत्कारिक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या 15 वर्षात या लीगने टीम इंडियाला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. लिलावात, सर्व फ्रँचायझींनी महान खेळाडूंचा समावेश करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले. मात्र काही खेळाडू सध्या फॉर्ममध्ये नाहीत. आम्ही तुम्हाला अशाच ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना मोठी किंमत तर मिळाली, मात्र चांगला खेळ दाखवण्यात ते अपयशी झाले.

या यादीत पहिले नाव सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकचे आहे. हैदराबादने या खेळाडूला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट करण्यासाठी १३.२५ कोटी रुपये खर्च केले होते. पण आजपर्यंत ब्रुकला चांगला खेळ दाखवता आला नाहीय.

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात हॅरी ब्रूकवर मोठी जबाबदारी होती. मात्र तो केवळ १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात हैदराबाद संघाला ७२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने दुसरा सामना केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला. या सामन्यातही हॅरी ब्रूकचा फ्लॉप शो कायम राहिला आणि तो अवघ्या ३ धावांवर बाद झाला. लखनऊ संघाने हैदराबादचा ५ गडी राखून पराभव केला.

दुसरे नाव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचे आहे. या डॅशिंग अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी इतकी मोठी रक्कम देऊन आपल्या संघात समाविष्ट केले होते. आतापर्यंत २ सामन्यांमध्ये ग्रीनला पैसा वसुल खेळी खेळता आलेली नाही.

ग्रीनने आपल्या फलंदाजीनेच नव्हे तर गोलंदाजीनेही सर्वांना निराश केले आहे. पहिल्या सामन्यात या स्टार अष्टपैलू खेळाडूने केवळ दोन षटकांत ३० धावा दिल्या. त्याचवेळी त्याने आरसीबीविरुद्ध फलंदाजी करताना केवळ ५ धावा केल्या. या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात ग्रीनचा फ्लॉप शो अबाधित राहिला. या सामन्यात तो गोलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तो निर्णायक वेळी १२ धावा करून बाद झाला. मुंबईने घरच्या मैदानावरच सीएसकेकडून ७ विकेट्सने पराभव केला आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टोक्स त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएल २०२३च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्सने या खेळाडूवर १६.२५ कोटी रुपये खर्च केले होते. पण तो अजूनही आपली छाप सोडू शकलेला नाही.

पहिल्या सामन्यात स्टोक्स अवघ्या ७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी केली नाही. दुसऱ्या सामन्यातही तो केवळ ८ धावांवर बाद झाला. स्टोक्सने आपल्या कामगिरीने चेन्नईच्या आशा पल्लवित केल्या आहेत. आता आगामी सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.