IPL 2023: MS Dhoni च्या CSKला दुखापतग्रस्त मुकेश चौधरीसाठी हवाय पर्याय; 'या' 3 नावांची चर्चा

IPL चा नवा सीझनपासून उद्यापासून होणार सुरू

CSK, Mukesh Choudhary Replacement: IPL 2023 यंदा ३१ मार्च म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे १० संघ विजेतेपदाची मैदानात उतरणार आहेत.

या वर्षीही स्पर्धा रंगतदार असेल, पण यंदा बरेचसे भारतीय आणि परदेशी खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार आहेत. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, रिषभ पंतसारखे तगडे खेळाडू यंदाच्या IPL मध्ये दिसू शकणार नाहीत.

याच यादीतील एक नाव म्हणजे, चेन्नई सुपर किंग्स संघाचा (CSK) वेगवान गोलंदाज मुकेश चौहान. मुकेशने गेल्या वर्षीचे IPL गाजवले, पण यावर्षी हा खेळाडू दुखापतीमुळे IPLच्या यंदाच्या पूर्ण सीझनला मुकणार आहे. त्याच्या जागी CSKचा संघ पुढील तीन पर्यायांचा विचार करत आहे.

मुज्तबा युसूफ (Mujtaba Yousuf)- जम्मू काश्मीरचा मुज्तबा आतापर्यंत कोणत्याही IPL संघाकडून खेळलेला नाही. तो २० वर्षांचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत २१ टी२० सामन्यात २० विकेट्स घेतल्या आहेत.

सुशांत मिश्रा (Sushant Mishra)- सुशांतने विजय हजारे स्पर्धेत केवळ तीन सामने खेळले. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याला संधी मिळाली नाही. पण सुशांत हा MS धोनीच्या झारखंडचा आहे. त्याची उंची आणि वेगवान गोलंदाजी पाहता त्याला CSKकडून संधी मिळू शकते.

अरझान नागवासवाला (Arzan Nagwaswalla)- स्विंग गोलंदाज अरझान हा वरील दोन खेळाडूंपेक्षा अनुभवी आहे. मुकेश चौधरीसाठी सर्वोत्तम पर्याय अरझान ठरू शकतो. त्याने आतापर्यंत २५ टी२० सामन्यांमध्ये ३५ विकेट्स घेतल्या आहेत. तो टीम इंडियासोबत परदेश दौऱ्यावर गेला होता, मात्र त्याला खेळण्यासाठी संधी मिळाली नाही.