Join us  

श्रेयस अय्यर IPL 2021ला मुकणार?; अजिंक्य रहाणेसह Delhi Capitalsच्या कर्णधारपदासाठी पाच नावं चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 6:20 PM

Open in App
1 / 10

India vs England, ODI series : भारतीय संघानं पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडला पराभवाची चव चाखवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, टीम इंडियाला बुधवारी मोठा धक्का बसला. मंगळवारी झालेल्या या सामन्यात श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांना दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते.

2 / 10

दोघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरले नाही. त्यात अय्यरला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार अय्यरनं उर्वरित मालिकेतून ( Shreyas Iyer has been ruled out of remaining of the ODI series against England) माघार घेतली आहे. BCCIनं अजूनही अधिकृत ट्विट केलेले नाही.

3 / 10

इंग्लंडच्या डावाच्या ८व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तो या सामन्यात मैदानावर उतरू शकणार नसल्याचे BCCIनं स्पष्ट केलं. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनचा रिपोर्ट आल्यावर समजेल. पण बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार अय्यरने मालिकेतून माघार घेतली आहे.

4 / 10

श्रेयसची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला जवळपास दोन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. श्रेयस अय्यर आयपीएलच्या मागील ३ पर्वात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.

5 / 10

२०१९मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघानं प्ले ऑफमध्ये मजल मारली आणि मागच्या वर्षी संघ प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करू शकला. तज्ज्ञांच्या मते खांद्याचं हाड सरकलं असेल, तर ते ठिक होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात आणि शस्त्रक्रिया झाली तर हा कालावधी अजून वाढू शकतो. अशात ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलला तो मुकण्याची शक्यता आहे.

6 / 10

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलला मुकण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) सह पाच नावं कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. दिल्लीच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत आणि यंदा त्यांनी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) यालाही ताफ्यात घेतले आहे.

7 / 10

राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व सांभाळताना स्मिथला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण, अनुभवी खेळाडू म्हणून त्याचं नाव चर्चेत आहे. शिवाय पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw), शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) ही नावंही चर्चेत आहेत.

8 / 10

२०१८मध्ये पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता आणि त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईनं विजय हजारे ट्रॉफी जिंकली. २१ वर्षीय पृथ्वी हा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप व विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा पहिलाच खेळाडू आहे.

9 / 10

दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) रिटेन खेळाडू : शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, अवेश खान, प्रवीण दुबे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, क्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स

10 / 10

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) २.२ कोटी, उमेश यादव (Umesh Yadav) १ कोटी, रिपाल पटेल ( Ripal Patel) २० लाख, विष्णू विनोद ( Vishnu Vinod) २० लाख, लुकमन मेरिवाला ( Lukman Meriwala) २० लाख, एम सिद्धार्थ ( M Siddharth) २० लाख, टॉम कुरन ( Tom Curran) ५.२५ कोटी, सॅम बिलिंग (Sam Billings) २ कोटी.

टॅग्स :आयपीएलअजिंक्य रहाणेदिल्ली कॅपिटल्सस्टीव्हन स्मिथशिखर धवनरिषभ पंतआर अश्विन