चार फलंदाजांनी सलामीसाठी 408 धावांची केली भागीदारी
हे असं कसं घडलं असेल, याचे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण 2007मध्ये हे घडलं आहे. मे 2007मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ढाका येथे दुसरी कसोटी खेळवण्यात आली. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 610 धावा केल्या. धावफलकावर 408 धावा असताना भारतानं पहिली विकेट गमावली, परंतु या धावा करण्यासाठी चार फलंदाजांनी हातभार लावला. वासीम जाफर व दिनेश कार्तिक हे सलामीला आहे. पहिल्या दिवसाच्या टी ब्रेकला कार्तिक रिटायर्ड झाला, त्यानंतर राहुल द्रविड फलंदाजीला आला अन् 281 धावा असताना जाफरही ( 138 धावा) रिटायर्ड झाला. त्यानंतर सचिन तेंडुलकर व द्रविडनं फटकेबाजी केली. धावफलकार 406 धावा झळकल्यानंतर द्रविड बाद झाला. त्यानंतर कार्तिक पुन्हा फलंदाजीला आला व 129 धावा करून माघारी परतला. सचिन 122 धावांवर नाबाद राहिला.