Cricket Buzz»फोटो गॅलरी »7 असे कर्णधार ज्यांनी ह्या वर्षी घेतली क्रिकेटमधून निवृत्ती7 असे कर्णधार ज्यांनी ह्या वर्षी घेतली क्रिकेटमधून निवृत्ती By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 4:09 PMOpen in App1 / 7भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने ५ जानेवारी रोजी क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारातून कर्णधार म्हणून निवृत्ती घेतली. धोनीने १९९ सामन्यात भारताचे नेतृत्व केले. सध्या धोनी कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटचा कर्णधार नसून तो भारतीय एकदिवसीय आणि टी२० संघाचा नियमित सदस्य आहे.2 / 7कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच सार्वधिक सामन्यात नेतृत्व करणारा आणि इंग्लंडचा सार्वधिक धावा करणारा कसोटी खेळाडू अॅलिस्टर कूकने फेब्रुवारी महिन्यात कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. सध्या तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने ५९ सामन्यात इंग्लंडचे कसोटी नेतृत्व केले.3 / 7२०१५-२०१७ या काळात ३१ वनडे सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व केलेल्या अझहर अलीने फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानचे वनडे कर्णधारपद सोडले. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ३१ सामन्यात १८ पराभव आणि १२ विजय मिळवले.4 / 7बांगलादेश संघाचे सार्वधिक २६ सामन्यांत नेतृत्व सांभाळणाऱ्या मश्रफी मुर्तझाने एप्रिल महिन्यात हे कर्णधारपद सोडले. यात त्याने १० विजय आणि १७ पराभव पहिले. तो वनडे कर्णधारपदी मात्र कायम असून त्यात त्याने ४७ सामन्यात या संघाचे आजपर्यत नेतृत्व केले आहे.5 / 7जुलै महिन्यात झिम्बाब्वे संघाकडून मिळालेल्या हारची नैतिक जबाबदारी स्वीकारत अँजलो मॅथ्यूजने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून कर्णधार म्हणून निवृत्ती घेतली. त्याने तब्बल ९८ वनडे सामने कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली. 6 / 7३६० डिग्री फलंदाज म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या एबी डीव्हीलर्सनेही आफ्रिकेचा वनडे कर्णधार म्हणून या वर्षी निवृत्ती जाहीर केली. बाकी प्रकारातून कर्णधार म्हणून तो यापूर्वीच निवृत्त झाला आहे. परंतु तोही आपले आंतरारष्ट्रीय कारकीर्द सुरु ठेवणार आहे. एबीने दक्षिण आफ्रिकेकडून नेतृत्व केलेल्या सामन्यांपैकी ६०% सामने त्याने जिंकले आहेत. 7 / 7मिसबाह उल हक या पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने यावर्षी कर्णधार तसेच खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर्षी राजीनामा दिलेला तो एकमेव असा कर्णधार आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुढे सुरु ठेवणार नाही. त्याने पाकिस्तानसाठी ५६ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यातील २६ सामने जिंकले आहेत तर १९ सामने हरले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications