Cricket Buzz»फोटो गॅलरी »99 Not Out; तरीही गेलचं विक्रमी शतक, तेंडुलकरशी बरोबरी99 Not Out; तरीही गेलचं विक्रमी शतक, तेंडुलकरशी बरोबरी By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 2:50 PMOpen in App1 / 8किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रमुख फलंदाज ख्रिस गेलने शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दमदार फलंदाजी केली. गेलने 64 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 99 धावा कुटल्या. 2 / 8त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 4 बाद 173 धावा केल्या, परंतु विराट कोहली ( 67) आणि एबी डिव्हिलियर्स ( 59) यांनी बंगळुरूला 8 विकेट राखून विजय मिळवून दिला.3 / 8ख्रिस गेलला आयपीएलमधील सातव्या शतकापासून एका धावेने वंचित रहावे लागले. मात्र, तरीही त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विशेष पराक्रम केला. 4 / 8ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शंभरवेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम गेलने केला. विक्रमाचे हे शतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. ट्वेंटी-20त त्याच्या नावावर 21 शतकं आणि 79 अर्धशतकं आहेत. सचिन तेंडुलकरने वन डे व कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम हा मान पटकावला होता. 5 / 8ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल ( 12640) अव्वल स्थानावर आहे. त्याने 370 डावांत 38.94च्या सरासरीने या धावा चोपल्या आहेत. 6 / 8त्याच्या नाबाद 99 धावांच्या खेळीने चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाच्या आगळ्यावेगळ्या विक्रमाशीही बरोबरी केली. आयपीएलमध्ये 99 धावांवर नाबाद राहणारा तो रैनानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. 7 / 8रैनाला 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 99 धावांवर नाबाद रहावे लागले होते. याशिवाय एका धावेने शकतापासून वंचित राहणारा तो चौथा फलंदाज ठरला.8 / 8रैना आणि गेल यांच्याशिवाय विराट कोहली ( वि. दिल्ली कॅपिटल्स, 2013) आणि पृथ्वी शॉ ( वि. कोलकाता नाईट रायडर्स, 2019) हे 99 धावांवर बाद झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications