Join us  

RCB जर एकदा IPL जिंकायला लागली तर बाकीच्यांचं काही खरं नाही, एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 4:03 PM

Open in App
1 / 10

अलीकडेच आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएलचा मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावासाठी सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीकडे सर्वाधिक ४२ कोटी रूपये असणार आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले आहे.

2 / 10

एबी डिव्हिलियर्स आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा हिस्सा राहिला आहे. त्यामुळे त्याने आरसीबीच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करताना म्हटले, 'आरसीबीच्या संघाने एकदा आयपीएल जिंकायला सुरूवात केली तर ते सलग आयपीएलचे किताब जिंकत जातील.'

3 / 10

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने शानदार खेळी केली आहे. मात्र मागील हंगामात सुरुवातीपासून चमकदार कामगिरी करून देखील आरसीबीला आयपीएलचा किताब जिंकता आला नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे आरसीबीच्या संघाने एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावले नाही. खरं तर तब्बल ७वेळा आरसीबीला प्लेऑफमध्ये जागा मिळाली होती.

4 / 10

आता आगामी हंगामासाठी आरसीबीच्या संघाने विराट कोहलीला संघात कायम ठेवले आहे. तर आरसीबीच्या फ्रँचायझीने जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्‍वर गौतम, चामा मिलिंद, लवनीथ सिसोदिया, शेरफेन रदरफोर्ड या खेळाडूंना रिलीज केले आहे. याचबाबत बोलताना संघाचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने विविध मुद्यांवर भाष्य केले.

5 / 10

आताच्या घडीला आरसीबीचा संघ - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ॲलेन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोम, महिपाल लोम सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.

6 / 10

आरसीबीकडे आता आयपीएल २०२३च्या लिलावासाठी ८.७५ कोटींची रक्कम शिल्लक आहे. वेस्ट इंडिजच्या संघाचा घातक फलंदाज शेरफेन रदरफोर्डला आरसीबीच्या फ्रँचायझीने रिलीज केले आहे, त्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.

7 / 10

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना डिव्हिलियर्सने म्हटले, 'आता किती हंगाम झाले आहेत? १४ किंवा १५ बरेच झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता या बेड्या तोडायला आवडेल. मला वाटते की जर आरसीबीने आगामी एक हंगाम जिंकला तर ते दोन, तीन, चार सलग जिंकतील. त्यामुळे थांबा आणि पाहा काय होते ते, टी-२० क्रिकेट हा काहीवेळा जुगाराचा खेळ असतो, काहीही होऊ शकते.'

8 / 10

डिव्हिलियर्सने अलीकडेच त्याच्या नवीन भूमिकेबद्दल संघाशी चर्चा करण्यासाठी बंगळुरूला भेट दिली आणि आगामी हंगामातील पहिल्या घरच्या सामन्यासाठी तो ख्रिस गेल सोबतच्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले. तो आगामी हंगामात आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसणार आहे.

9 / 10

'माझे आरसीबीवर खूप प्रेम आहे, ते माझ्यासाठी जग आहे. आरसीबीमुळेच माझे आयुष्य बदलले आहे. मी २०११ पासून तिथे आहे, मी आयुष्यभरासाठी मित्र बनवले आहेत. हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही सगळे आरसीबीयन आहोत', अशा शब्दांत डिव्हिलियर्सने आरसीबी आणि त्याच्या नात्याबद्दल सांगितले.

10 / 10

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी डिव्हिलियर्सने २०११ ते २०२१ पर्यंत आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेल्या डिव्हिलियर्सने आपल्या खेळीने आरसीबीला एक नवीन ओळख करून दिली होती. त्याच्या अविस्मरणीय खेळीमुळे त्याने भारतीय चाहत्यांच्या देखील मनात जागा केली आहे.

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएबी डिव्हिलियर्सविराट कोहलीआयपीएल लिलावआयपीएल २०२२
Open in App