पॉवर प्लेचा नवा किंग ठरला अभिषेक शर्मा! टॉप ५ मध्ये KL राहुलचाही लागतो नंबर

यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडीत काढत अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पॉवर प्लेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मानं अनेक विक्रम आपल्या नावे केले. यात भारताकडून पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा नवा विक्रमही सेट केला.

यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडीत काढत अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पॉवर प्लेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.

इथं एक नजर टाकुयात भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांवर ज्यांनी पॉवर प्लेमध्ये दाखवलीये आपल्याय बॅटिंगची ताकद

अभिषेक शर्मानं वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी -२० सामन्यात पॉवर प्लेमध्ये ५८ धावा ठोकल्या.

याआधी आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा यशस्वी जैस्वालच्या नावे होता. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध यशस्वी जैस्वालनं ५३ धावा केल्या होत्या.

भारतीय टी-२० संघाचा माजी कॅप्टन हिटमॅन रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लढतीत त्याने ५१ धावा काढल्या होत्या.

चौथ्या क्रमांकावरही रोहितचा दबदबा पाहायला मिळतो. २०२० मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात रोहित शर्मानं पॉवर प्लेमध्ये हिट शो दाखवून देताना ५० धावा कुटल्या होत्या.

लोकेश राहुलनं २०२१ मध्ये स्कॉटलंड विरुद्धच्या लढतीत पॉवर प्लेमध्ये ५० धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे.