Join us  

विरुष्काचा दाखला देत अभिनेत्रीला शुबमन गिलसंदर्भात प्रश्न; ती म्हणाली आम्ही दोघे फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 6:18 PM

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील डेटिंग-सेटिंगच्या गोष्टीमुळे चर्चेत असतो.

2 / 8

शुबमन गिलचे नाव हे सारा तेंडुलकर ते अगदी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबतही जोडण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे.

3 / 8

त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे एका जाहिरातीच्या निमित्ताने शुबमन गिलला भेटली अन् चाहत्यांमध्ये दोघांची 'जोडी जमली रे' हे गाणं वाजू लागलं.

4 / 8

एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर रिप्लाय देताना अनन्या पांडे हिने क्रिकेटर शुबमन गिलसोबतच्या रिलेशनशिपसंदर्भात रंगलेल्या चर्चेवर मौन सोडले आहे.

5 / 8

एका शोमध्ये अभिनेत्रीला चाहत्याने दिलेल्या कमेंटवरून प्रश्न विचारला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी जाहिरातीच्या शूट वेळी पहिल्यांदा भेटली. पुढे दोघांनी लग्नही केले. भविष्यात अनन्या- शुबमन गिल जोडी एकत्र आल्याचे पाहायला मिळेल का? असा तो प्रश्न होता.

6 / 8

शुबमन गिल आणि अनन्या पांडे ही जोडी नुकतीच एका जाहिरातीत झळकली होती. तेव्हापासूनच त्यांच्यात डेटिंगचा खेळ सुरु असल्याची चर्चा रंगू लागली.

7 / 8

यावर रिप्लाय देताना अनन्या पांडे म्हणाली की, 'ते विराट अन् अनुष्का होते. मी वेगळी आहे. शुबमन गिलसोबत तसे काहीच नाही. आम्ही फक्त जाहिरातीच्या शूटसाठी एकत्र आलो. बाकी काही नाही.'

8 / 8

सारा तेंडुलकर, सारा अली खान आणि अनन्या यांच्याशिवाय शुबमन गिलचं नाव टेलिव्हिजन अभिनेत्री रिद्धिमा पंडित सोबतही जोडण्यात आले होते. पण ती चर्चाही फक्त अफवाच ठरली.

टॅग्स :ऑफ द फिल्डशुभमन गिलअनन्या पांडेदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टरिलेशनशिप