क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कमबॅक; पंतची खेळी गिलख्रिस्टच्या मनालाही भावली

पंतनं कमबॅकच्या कसोटी सामन्यात धमाकेदार शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कमबॅक केले.

नोव्हेंबर २०२२ नंतर तो थेट सप्टेंबर २०२४ रोजी कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

गंभीर अपघातातून अगदी जलद रिकव्हर होत त्याने मर्यादीत षटकांच्या सामन्यातून त्याने क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले होते. ही परीक्षा पास झाल्यावर कसोटीत क्षमता सिद्ध करण्याचे त्याच्यासमोर मोठं चॅलेंज होते.

कसोटीत अगदी तोऱ्यात कमबॅक करत त्याने प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी अगदी सहज शक्य होतात, ही प्रेरणादायी स्क्रीप्टच लिहिलीये.

पंतच्या कमबॅकवर क्रिकेट जगतातील विकेटमागे ऐककाळ गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एडम गिलख्रिस्टनं खास प्रतिक्रिया दिली आहे.

क्रिकेट जगतातील विकेटमागे ऐककाळ गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एडम गिलख्रिस्टनं भारतीय विकेट किपर बॅटर पंतच्या कमबॅकवर खास प्रतिक्रिया दिली आहे.

क्लब पेरियार फायर पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याने पंतनं इतिहासीत एक सर्वोत्तम कमबॅक केले आहे, असे म्हटले आहे.

पंतनं मानसिक आणि शारीरिकरित्या कठीण, कणखर आणि मजबूत कमबॅक करून दाखवलं आहे. याआधी असं कमबॅक कोणी केल्याचं आठवत नाही, असे म्हणत गिलख्रिस्टनं भारतीय विकेट किपर बॅटरचं कौतुक केलं आहे.