'ते' २ नियम माहित नसल्याने अफगाणिस्तानचा घात झाला; श्रीलंकेविरुद्धचा हातचा सामना गेला

AFG vs SL Live : आशिया चषक स्पर्धेतील ब गटातील अखेरचा साखळी सामना चुरशीचा झाला. बांगलादेशने या गटातून आधीच सुपर ४ मधील जागा पक्की केली होती. त्यामुळे एका जागेसाठी अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्यात कडवी टक्कर झालेली पाहायला मिळाली. फक्त २ नियम माहित नसल्याने अफगाणिस्तानने हातची मॅच गमावली.

श्रीलंकेने २९१ धावांचा डोंगर उभा केला, परंतु अफगाणिस्तानला हे लक्ष्य ३७.१ षटकांत पार करायचे होते. त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्नही झाले अन् ते २८९ धावांपर्यंतही पोहोचले. पण, फक्त 'ते' २ नियम माहित नसल्याने त्यांना हातची मॅच गमवावी लागली.

पथूम निसंका ( ४१) आणि दिमुथ करुणारत्ने ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. कुसल मेंडिस व चरिथ असलंका ( ३६) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मेंडिसने ८४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावा केल्या. त्याला दुर्दैवीरित्या रन आऊट व्हावे लागले.

दुनिथ वेल्लालागे ( ३३*) व महीष थीक्षणा ( २४) यांनी आठव्या विकेटसाठी ५०+धावांची भागीदारी केली आणि श्रीलंकेला ८ बाद २९१ धावांपर्यंत पोहोचवले. अफगाणिस्तानच्या राशीद खानने ६३ धावांत २, तर गुलबदीन नैबने ६० धावांत ४ विकेट्स घेतल्या.

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर गुलबदीन नैब ( २२), रहमत शाह ( ४५) यांनी डाव सावरला. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने मोहम्मद नबीसह चौकार-षटकारांची आतषबाजी केली. नबीने ३२ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून सामना खेचून आणला. शाहिदी ५९ धावांवर बाद झाला.

राशीद खान आणि नजीबुल्लाह झाद्रान ( २२) हे मैदानावर असताना १३ चेंडू २७ धावा असं समीकरण जुळवून आणलं. ७ चेंडूंत १५ धावा हव्या होत्या आणि राशीदने ४,०,४,४ असे फटके मारले. १ चेंडू ३ धावांची गरज असताना मुजीब उर रहमान झेलबाद झाला अन् राशीद ( २७*) मैदानावर बसून निराश झाला. पण, याहीनंतर त्यांना विजयाची संधी होती.

३७.१ षटकांत अफगाणिस्तानने सामना २९१ असा बरोबरीत जरी आणला असता आणि पुढील चेंडूवर षटकार खेचून २९७ धावा जरी केल्या असत्या तरी अफगाणिस्ताचा विजय झाला असता.

अफगाणिस्तानने ३७.५ षटकांत २९५ धावा जरी केल्या असत्या तरी त्यांचा आणि श्रीलंकेचा रन रेट बरोबरीचा झाला असता. अशा परिस्थितीत सुपर ४ चा निकाल कॉईन टॉसवर लागला असता