Join us  

'ते' २ नियम माहित नसल्याने अफगाणिस्तानचा घात झाला; श्रीलंकेविरुद्धचा हातचा सामना गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 10:55 PM

Open in App
1 / 7

श्रीलंकेने २९१ धावांचा डोंगर उभा केला, परंतु अफगाणिस्तानला हे लक्ष्य ३७.१ षटकांत पार करायचे होते. त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्नही झाले अन् ते २८९ धावांपर्यंतही पोहोचले. पण, फक्त 'ते' २ नियम माहित नसल्याने त्यांना हातची मॅच गमवावी लागली.

2 / 7

पथूम निसंका ( ४१) आणि दिमुथ करुणारत्ने ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. कुसल मेंडिस व चरिथ असलंका ( ३६) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मेंडिसने ८४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावा केल्या. त्याला दुर्दैवीरित्या रन आऊट व्हावे लागले.

3 / 7

दुनिथ वेल्लालागे ( ३३*) व महीष थीक्षणा ( २४) यांनी आठव्या विकेटसाठी ५०+धावांची भागीदारी केली आणि श्रीलंकेला ८ बाद २९१ धावांपर्यंत पोहोचवले. अफगाणिस्तानच्या राशीद खानने ६३ धावांत २, तर गुलबदीन नैबने ६० धावांत ४ विकेट्स घेतल्या.

4 / 7

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर गुलबदीन नैब ( २२), रहमत शाह ( ४५) यांनी डाव सावरला. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने मोहम्मद नबीसह चौकार-षटकारांची आतषबाजी केली. नबीने ३२ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६५ धावा करून सामना खेचून आणला. शाहिदी ५९ धावांवर बाद झाला.

5 / 7

राशीद खान आणि नजीबुल्लाह झाद्रान ( २२) हे मैदानावर असताना १३ चेंडू २७ धावा असं समीकरण जुळवून आणलं. ७ चेंडूंत १५ धावा हव्या होत्या आणि राशीदने ४,०,४,४ असे फटके मारले. १ चेंडू ३ धावांची गरज असताना मुजीब उर रहमान झेलबाद झाला अन् राशीद ( २७*) मैदानावर बसून निराश झाला. पण, याहीनंतर त्यांना विजयाची संधी होती.

6 / 7

३७.१ षटकांत अफगाणिस्तानने सामना २९१ असा बरोबरीत जरी आणला असता आणि पुढील चेंडूवर षटकार खेचून २९७ धावा जरी केल्या असत्या तरी अफगाणिस्ताचा विजय झाला असता.

7 / 7

अफगाणिस्तानने ३७.५ षटकांत २९५ धावा जरी केल्या असत्या तरी त्यांचा आणि श्रीलंकेचा रन रेट बरोबरीचा झाला असता. अशा परिस्थितीत सुपर ४ चा निकाल कॉईन टॉसवर लागला असता

टॅग्स :एशिया कप 2023अफगाणिस्तानश्रीलंका
Open in App