मोठी बातमी : India-Pakistan चे खेळाडू एकाच संघात खेळणार; Jay Shah यांनी घेतलाय पुढाकार, बघा कधी होणार चमत्कार!

Afro-Asia Cup India and Pakistan - २००० सालच्या सुमारास आशियाई XI संघात पाकिस्तानचा शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि भारताचे वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड हे एकाच संघाकडून खेळले होते. आफ्रिकन XI संघात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व केनिया संघातील खेळाडूंचा समावेश होता.

India and Pakistan - भारत-पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमधील संबंध काही ठिक नाही... पाकिस्तानातून सातत्याने दहशतवादी कृत्यांना मिळणाऱ्या खतपाण्यामुळे भारताने शेजाऱ्यांशी सर्व संबंध तोडले आहेत. २०१२-१३नंतर दोन्ही देशांमध्ये मालिका झालेली नाही, तर २००७पासून दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कसोटीही खेळलेले नाहीत.

ICC आणि Asia Cup स्पर्धेच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान सामना चाहत्यांना पाहायला मिळतो. पण, आता लवकरच भारत व पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांविरुद्ध नाही, तर एकमेकांसोबत एकाच संघात खेळताना दिसणार आहेत. BCCI चे सचिव व आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष ( ACC) जय शाह ( Jay Shah) प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Afro-Asia Cup स्पर्धेच्या निमित्ताने भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसणार असल्याचे वृत्त forbes ने प्रसिद्ध केले आहे. २०२३ च्या मध्यंतरात ही स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना २००८नंतर इंडियन प्रीमिअर लीगमध्येही बंदी घातली गेली आहे.

अशात भारत व पाकिस्तानचे खेळाडू खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. २०१८पासून आशिया चषक झालेला नाही आणि या स्पर्धेचं स्वरूप आता ट्वेंटी-२० व वन डे असं राहिलं आहे. या स्पर्धेतही India vs Pakistan यांच्यातला सामना महत्त्वाचं आकर्षण असतो.

२००५ व २००७ मध्ये Afro-Asia Cup खेळवण्यात आला होता. ACC चे प्रमुख जय शाह ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. २००० सालच्या सुमारास आशियाई XI संघात पाकिस्तानचा शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि भारताचे वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड हे एकाच संघाकडून खेळले होते. आफ्रिकन XI संघात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व केनिया संघातील खेळाडूंचा समावेश होता.

आता सुधारित Afro-Asia Cup स्पर्धी ही ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये असेल आणि पुढील वर्षी जून-जुलैमध्ये खेळवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी येत्या एप्रिल महिन्यात जयशाह, आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचे नवीन चेअरमन सुमोद दामोदर आणि ACC च्या डेव्हलपमेंट कमिटीचे महिंदा वल्लिपूरम हे आयसीसीसोबत चर्चा करणार आहेत.

''याबाबत आम्हाला बोर्डाकडून अद्याप काही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. पण, कागदावर चर्चा सुरू आहे आणि अंतिम प्रस्ताव दोन्ही बोर्डांकडे पाठवला जाईल. भारत व पाकिस्तान या संघांतील सर्वोत्तम खेळाडू आशियाई एकादश संघात असावेत ही आमची कल्पना आहे. एकदा का याला अंतिम स्वरूप मिळाले की त्याची घोषणा केली जाईल, ''असे ACCचे कमर्शियल व इव्हेंटचे प्रमुखे प्रभाकरन थनराज यांनी Forbes ला सांगितले.