Join us  

शाहिद आफ्रिदीचा जावई जसप्रीत बुमराहपेक्षा सरस; विराट vs बाबर तुलना करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूची मुक्ताफळं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 4:07 PM

Open in App
1 / 7

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामने होत नसले तरी भारतीय खेळाडू vs पाकिस्तानी खेळाडू असा सामना रंगवण्यात पाकिस्तानचे माजी खेळाडू व्यग्र आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेद ( Aaqib Javed) यानं नुकतंच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांच्यात तुलना केली होती. Virat Kohli vs Babar Azam

2 / 7

मागील अनेक वर्षांपासून विराट vs बाबर असा सामना मैदानाबाहेर सुरूच आहे. पण, जावेद यांनी बाबर हा तंत्रशुद्ध फलंदाज असून त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली. ते इथवरच थांबले नाही, तर त्यांनी विराटनं पाकिस्तानी फलंदाजाकडून फलंदाजीतील तंत्र शिकून घ्यावे असाही सल्ला दिला.

3 / 7

'विराट कोहलीकडे बाबर आझमच्या तुलनेनं चांगले शॉट्स आहेत. पण त्याची एक कमकुवत बाजू देखील आहे. चेंडू स्विंग करु लागला तर कोहली गोलंदाजाच्या जाळ्यात सहज अडकला जातो. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कोहलीला खेळताना आपण सर्वांनी हे पाहिलंच आहे. पण बाबर आझमच्या फलंदाजीत मला कोणतीच कमकुवत बाजू दिसत नाही. तंत्रशुद्ध फलंदाजीच्या बाबतीत बाबर आझम विराट कोहलीपेक्षा उजवा आहे', असं अकिब जावेद म्हणाले.

4 / 7

बाबर आझमनं जर विराट कोहलीकडून फिटनेस टिप्स घेतल्या आणि त्यादृष्टीनं फिटनेसवर प्रयत्न केले तर तो आणखी चांगला खेळाडू होईल, असंही जावेद पुढे म्हणाले. २५ वर्षीय बाबर आझम पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाबर आझमनं अतिशय कमी वेळात खणखणीत फलंदाजीच्या जोरावर चांगलं यश प्राप्त केलं आहे.

5 / 7

आता ४८ वर्षीय जावेद यांनी जसप्रीत बुमराह व शाहीन शाह आफ्रिदी यांच्यात तुलना केली आहे. Jasprit Bumrah versus Shaheen Shah Afridi comparisons. बुमराहनं २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्याच्या नावावर जवळपास २५० विकेट्स आहेत. दुसरीकडे शाहीननं २०१९मध्ये पदार्पण करताना १२४ आंतरराष्ट्रीय विकेट्स नावावर केल्या आहेत.

6 / 7

जावेद म्हणाले,''जसप्रीत बुमराह हा चांगला गोलंदाज आहे आणि एक परिपूर्ण गोलंदाज होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुण आहेत. सध्याच्या घडीला डेथ बॉलिंगचा विचार केल्यास जसप्रीत हा शाहीनला मागे सोडेल. पण, नव्या चेंडूवर शाहीन हा भारतीय गोलंदाजावर वरचढ ठरतो.''

7 / 7

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या (shahid afridi) थोरल्या मुलीसोबत शाहीन शाहच्या (Shaheen Shah) रेशीमगाठी जुळून आल्या आहेत. आफ्रिदीनं काही दिवसांपूर्वी स्वतः ही घोषणा केली होती.

टॅग्स :जसप्रित बुमराहपाकिस्तानविराट कोहली