पहिल्या टी-२० मधील पराभवानंतर भारतीय संघ असा झाला ट्रोल

भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या प्रत्येक विजयानंतर सोशल मीडियावर क्रिकेटचाहत्यांकडून मोठे कौतुक होते. मात्र, जेव्हा कधी संघ पराभूत हाेताे, तेव्हा मात्र नेटिझन्स आपल्या खेळाडूंना मीम्सच्या माध्यमातून ‘फटके’ देतात.

भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या प्रत्येक विजयानंतर सोशल मीडियावर क्रिकेटचाहत्यांकडून मोठे कौतुक होते. मात्र, जेव्हा कधी संघ पराभूत हाेताे, तेव्हा मात्र नेटिझन्स आपल्या खेळाडूंना मीम्सच्या माध्यमातून ‘फटके’ देतात.

विशेष करून जेव्हा हातातील सामना गमवावा लागतो तेव्हा तर नेटिझन्सचा वेग सुसाट होतो आणि मग काही भन्नाट मीम्स सादर करून टीम इंडियाला फटकारले जाते. अशाच अनेक मीम्सचा पाऊस मंगळवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर पडला.

भुवनेश्वर कुमारला १९ व्या षटकात गोलंदाजी दिल्यानंतर भारतीय चाहत्यांची अवस्था.

भारतीय संघाच्या पाठिराख्यांचा पहिल्या डावातील आनंद आणि त्यानंतर दुसऱ्या डावात झालेली स्थिती.

भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहिल्यानंतर भारताच्या चाहत्यांची झालेली अवस्था.

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडची फटकेबाजी पाहून पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना झालेला आनंद.

डेथ ओव्हर्समध्ये धावांचा बचाव करण्यास सांगितल्यावर भुवनेश्वर आणि हर्षल पटेल यांची प्रतिक्रिया.

या शिवाय, नेटिझन्सनी खास मॅथ्यू वेडच्या फटकेबाजीवरुन भारत-पाक चाहत्यांसाठी ‘डिव्हायडेड बाय बॉर्डर्स, बट यूनायटेड बाय वेड’ अशी भन्नाट कॅप्शनही तयार केली.

याच वेडने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पाकविरुद्ध मोक्याच्या वेळी फटकेबाजी करत सामना पाकिस्तानच्या हातून हिसकावला होता. त्याचप्रकारची खेळी वेडने पहिल्या सामन्यातही केली आणि भारताचा पराभव झाला. यामुळेच नेटिझन्सनी वेडच्या निर्णायक भूमिकेवरुन भारत-पाकला टोला लावला.