Join us  

भारताला ICC ट्रॉफी जिंकून दिली नाही, तरीही विराट कोहलीला स्वतःचा अभिमान; म्हणाला, लोकं मला अयशस्वी समजतात पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:45 PM

Open in App
1 / 6

Virat Kohli on not winning ICC trophies - महेंद्रसिंग धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एक-दोन नव्हे तर तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. धोनीनंतर त्याचा उत्तराधिकारी विराट कोहलीची निवड करण्यात आली आणि कोहलीला त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही ICC ट्रॉफी जिंकून देता आलेली नाही.

2 / 6

आता टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने यावर मोठे वक्तव्य केले आहे. माझ्या कर्णधारपदाखाली टीम इंडिया आयसीसी ट्रॉफी जिंकू शकली नाही, त्यामुळेच लोक मला अपयशी कर्णधार मानतात. पण मी संघात संस्कृती बदल घडवून आणला आणि मला त्याचा खूप अभिमान आहे, असे कोहली म्हणाला.

3 / 6

RCB च्या पॉडकास्ट सीझन २ वर कोहली म्हणाला, 'पाहा मी २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे नेतृत्व केले होते आणि आम्ही अंतिम फेरीत हरलो. त्यानंतर २०१९ च्या वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आणि २०२१ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीत स्थान मिळवू शकले नाही. अशा प्रकारे तीन-चार वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. त्यामुळेच लोक विचार करतात. मी एक अयशस्वी कर्णधार ( चेहऱ्यावर हसू).

4 / 6

कोहली पुढे म्हणाला, 'मी संघाच्या संस्कृतीत बदल घडवून आणला. कारण स्पर्धा येतात आणि जातात पण संघाची संस्कृती अनेक वर्षे टिकून राहते. त्यामुळे मी केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे. लोकांना काय वाटते? याने काहीच फरक पडत नाही.'

5 / 6

दुसरीकडे कोहली त्याच्या कारकिर्दीबद्दल पुढे म्हणाला, 'पाहा, एक खेळाडू म्हणून मी वर्ल्ड कप विजेत्या संघाचा एक भाग होतो. मी खेळाडू म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. जिंकलेल्या संघाचा मी देखील एक भाग होतो. कसोटीची ICC गदा मी पाच वेळा जिंकली. तुम्ही बघितले तर अनेक खेळाडू त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत वर्ल्ड कप जिंकू शकले नाहीत आणि मी खूप काही मिळवले आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

6 / 6

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरभारतीय क्रिकेट संघ
Open in App