इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात रिषभ पंत हा पाचवा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. २३ वर्ष व ६ महिने वय असलेल्या रिषभकडे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. श्रेयस अय्यरनं २३ वर्ष व ४ महिन्यांचा असताना दिल्लीचे नेतृत्व हाती घेतले होते.
सुरेश रैना ( २३ वर्ष व ३ महिने), स्टीव्ह स्मिथ ( २२ वर्ष व ११ महिने) आणि विराट कोहली ( २२ वर्ष व ६ महिने) हे आयपीएलमधील सर्वाय युवा कर्णधारांमध्ये अव्वल तीन स्थानावर आहेत.
सर्वात युवा कर्णधारांमध्ये रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर असला तरी त्याच्याकडे रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. रोहितनं २६ वर्ष व २७ दिवसांचा असताना आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. रिषभला यंदा जेतेपद पटकावून हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन ( २६ वर्ष)
किंग्स इलेव्हन पंजाब - लोकेश राहुल ( २८ वर्ष)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली ( ३२ वर्ष)
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( ३३ वर्ष)
सनरायझर्स हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर ( ३४ वर्ष)
कोलकाता नाइट रायडर्स - इयॉन मॉर्गन ( ३४ वर्ष)
चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी ( ३९ वर्ष)
यंदाच्या आयपीएलमधील रिषभ पंत हा सर्वात युवा कर्णधार आहे. ( Rishabh Pant is the youngest captain of 2021 season)
डेव्हिड वॉर्नर व इयॉन मॉर्गन हे दोन परदेशी कर्णधार आहे. ( David Warner and Eoin Morgan the two foreign captains)