Ajinkya Rahane may once again get a chance in Team India
Cricket Buzz»फोटो गॅलरी »मुंबईचा 'दिग्गज'! देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी; रहाणेची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री?मुंबईचा 'दिग्गज'! देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी; रहाणेची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री? By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 7:31 PMOpen in App1 / 8मागील काही कालावधीपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असलेला मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणे बऱ्याच दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे.2 / 8पण, आता तो टीम इंडियात पुनरागमन करणार का? अजिंक्य रहाणे पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार का? याची सर्वत्र चर्चा आहे. 3 / 8अलीकडेच त्याने काउंटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. अजिंक्य रहाणेच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे ४० वे शतक ठरले. इराणी चषकात मुंबईने शेष भारत संघाचा पराभव करत इराणी चषक जिंकला. 4 / 8अजिंक्य रहाणेने मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अजिंक्य रहाणे लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकेल, अशी अटकळ बांधली जात आहे.5 / 8याआधी अजिंक्य रहाणे जुलै २०२३ मध्ये भारताकडून शेवटची कसोटी खेळला होता. तेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. रहाणेने ३६ चेंडूत ८ धावा केल्या होत्या. त्यानंतर अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.6 / 8मात्र, काउंटी क्रिकेट आणि इराणी चषकातील चमकदार कामगिरीनंतर पुनरागमनाची आशा आहे. आगामी काळात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. आता न्यूझीलंड मालिकेत अजिंक्य रहाणेला संधी मिळणार का हे पाहण्याजोगे असेल. 7 / 8न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणेचे पुनरागमन होऊ शकते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी १६ ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर या मालिकेनंतर भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल.8 / 8भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून खेळवली जाईल. आणखी वाचा Subscribe to Notifications