Cricket Buzz»फोटो गॅलरी »BCCI ने ज्यांना दुर्लक्षित केले, ते गाजवत आहेत IPL 2023; परफॉर्मन्समधून देत आहेत 'चपराक'!BCCI ने ज्यांना दुर्लक्षित केले, ते गाजवत आहेत IPL 2023; परफॉर्मन्समधून देत आहेत 'चपराक'! By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 6:04 PMOpen in App1 / 8ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय आणि त्याने आतापर्यंत ५ सामन्यांत ५० च्या सरासरीने २०० धावा केल्या आहेत आणि २ अर्धशतके ठोकली आहेत. ९२ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 2 / 8चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल २०२३ त खेळणारा अजिंक्य रहाणेचा फॉर्म सर्वांना अचंबित करणारा आहे. त्याने ३ सामन्यांत १९५ च्या स्ट्राईक रेटने १२९ धावा कुटल्या आहेत. 3 / 8मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने ४ सामन्यांत ५९ च्या सरासरीने १७७ धावा केल्या आहेत. 4 / 8२८ वर्षीय अष्टपैलू व्यंकटेश अय्यर आयपीएल २०२३ मध्ये दमदार कामगिरी करत आहे आणि त्याने शतकही झळकावले आहे. त्याने पाच सामन्यांत ४७च्या सरासरीने २३४ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. १३७ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने १९ चौकार आणि १५ षटकार मारले आहेत. 5 / 8शिखर धवन ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी संघातून बराच काळ बाहेर आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने आतापर्यंत त्याने ४ सामन्यांच्या ११७ च्या सरासरीने २३३ धावा केल्या आहे आणि त्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यात त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ९९ धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. 6 / 8मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती २०२१ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपासून भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. आयपीएल २०२३ मध्ये त्याने आतापर्यंत ५ सामन्यांत ७ विकेट घेतल्या आहेत. 7 / 8लेगस्पिनर रवी बिश्नोईनेही चांगली कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने ५ सामन्यात ८ बळी घेतले आहेत. 8 / 8तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. या २७ वर्षीय गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण अजून बाकी आहे. त्याने आतापर्यंत ५ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications