रविवारी आटोपलेल्या महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत बाजी मारली. या विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडच्या विजयात इंटरनॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेलिया केर हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेलिया केर हिने तिच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात बाजी पटवली होती. आता अमेलिया केर हिच्या खेळाबरोबरच तिच्या सौंदर्याचीही खूप चर्चा सुरू आहे.
अमेलिया केर हिने काल झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अमेलिया केर हिने ३८ चेंडून ४३ धावा काढल्या. तर गोलंदाजीमध्येही कमाल करताना तिने ३ बळी टिपले.
अमेलिया केर हिच्या संयमी खेळीमुळे न्यूझीलंडने पाच बाद १५८ धावांपर्यंत मजल मारली.
फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर अमेलिया केर हिने गोलंदाजीमध्येही कमाल करत २४ धावांत ३ फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव अडखळला आणि न्यूझीलंडचा विजय सुकर झाला.
अमेलिया केर हिने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील साखळी आणि बाद फेरीमध्येही जबरदस्त कामगिरीकेली होती. तसेच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आली होती. या कामगिरीसाठी तिला अंतिम सामन्यातील सामनावीरासोबतच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मानही मिळाला.
टी-२० विश्वचषकातील अष्टपैलू कामगिरीने अमेलिया केर हिला न्यूझीलंड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आघाडीची महिला क्रिकेटपटू म्हणून ओळख प्राप्त झाली आहे.
अमेलिया केर हिची कौटुंबिक पार्श्वभूमी क्रिकेटपटूंची आहे. तिचे आजोबा ब्रुस मरे हे न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट खेळले होते. तसेच तिची बहीण जेस केर हिनेही न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं होतं. अमेलिया केर हिने न्यूझीलंडकडून ७४ एकदिवसीय सामन्यात २०८२ धावा आणि ८२ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे. तर ८५ टी-२० सामन्यात तिने १२९६ धावा आणि ९३ बळी टिपले आहेत.