Join us  

कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धा नाही, तरीही टीम इंडियानं का गमावलं अव्वल स्थान?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 2:58 PM

Open in App
1 / 11

कोरोना व्हायरसच्या संकटात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून टीम इंडियाला हा धक्का बसला आहे. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे.

2 / 11

2016नंतर भारताला कसोटीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन संघानं हे अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीनं शुक्रवारी कसोटी, ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमधील संघांची क्रमवारी जाहीर केली. क्रिकेट स्पर्धा होत नसतानाही टीम इंडियानं अव्वल स्थान कसं गमावलं? जाणून घेऊया...

3 / 11

भारतीय संघानं ऑक्टोबर 2016मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. 2016मध्ये टीम इंडियानं 12 कसोटी सामने जिंकले होते, तर एक पराभव पत्करला होता.

4 / 11

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियनां पाच कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्धच्या मालिकेचाही समावेश होता. त्यामुळे तेव्हा टीम इंडिया कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाली होती.

5 / 11

आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर करताना 2016-17च्या मोसमातील आकडेवारी ग्राह्य धरलेली नाही. आसीसीनं 2017च्या मोसमातील आकडेवारीवर ही क्रमवारी निश्चित केली आहे.

6 / 11

2019नंतर खेळलेल्या सामन्यांतून 100 टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील कामगिरीच्या 50 टक्के गुणांची बेरीज करून ही क्रमवारी ठरवण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाला अव्वल स्थान गमवावे लागले.

7 / 11

ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 116 गुण जमा झाले असून न्यूझीलंड ( 115) आणि भारत ( 114) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.

8 / 11

2017मध्ये भारतानं 11 पैकी 7 कसोटी सामने जिंकले, एकात पराभव झाला आणि तीन सामने अनिर्णित राहीले.

9 / 11

2018मध्ये भारताला 14 पैकी 7 सामने जिंकता आले आणि 2019मध्ये आठपैकी सात सामने जिंकले. लॉकडाऊनपूर्वी टीम इंडियानं न्यूझीलंड दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळले आणि त्यात 0-2 असा पराभव पत्करावा लागला.

10 / 11

ट्वेंटी-20 क्रमवारीत पाकिस्तानने अव्वल स्थान गमावले

11 / 11

टॅग्स :आयसीसीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया