टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावतेय 'ही' अँकर!

Neroli Meadows, T20 World Cup 2022: भारतीय खेळाडूंसोबत एका सुंदर अँकरनेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारतीय संघाचे खेळाडू ICC T20 विश्वचषक 2022 स्पर्धेत खेळत आहेत. तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंसोबत एका सुंदर अँकरनेही क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. ही अँकर दुसरी कोणी नसून नेरोली मीडोज (Neroli Meadows) आहे.

नेरोली मीडोज (Neroli Meadows) एक ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रेझेंटर, स्पोर्ट्स जर्नलिस्ट आणि स्पोर्ट्स कमेंटेटर आहे. नेरोली मीडोज गेल्या T20 विश्वचषकातही दिसली होती.

क्रिकेट व्यतिरिक्त नेरोली मीडोजने (Neroli Meadows) बास्केटबॉल आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगचेही आयोजन केले आहे.

विकिपीडियाने दिलेल्या माहितीनुसार, नेरोली मीडोजचा (Neroli Meadows) जन्म 1985/1986 मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या (Western Australia) कुली (Collie) शहरात झाला होता.

नेरोली मीडोज (Neroli Meadows) ही आयपीएलमध्ये सुद्धा शो होस्ट करताना दिसली होती. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दोन्ही टप्प्यांदरम्यान, ती सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन आणि केविन पीटरसन यांच्यासोबत दिसली आणि आयपीएल 2022 मध्येही तिचा सहभाग होता.

नेरोली मीडोजचा (Neroli Meadows)आत्मविश्वास, स्टायलिश आउटफिट्स आणि ग्लॅमर पाहून क्रिकेट चाहते वेडे झाले आहेत. सोशल मीडियावरही ती खूप अॅक्टिव्ह असते.