विनोद कांबळीने त्याची बालपणीची मैत्रीण नोएला लुईस हिला २००५ मध्ये घटस्फोट दिला. नंतर त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर माजी मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे हे देखील प्रेमात हरले आहेत. त्यांनी पहिली पत्नी चेतना हिला घटस्फोट दिला. कुंबळेंचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत राहिले आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचा २००५ मध्ये घटस्फोट झाला. मग २०१३ वॉर्नने एलिझाबेथ हर्लेशी लग्न केले. ४ मार्च २०२२ रोजी त्याचा मृत्यू झाला.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने २०२० मध्ये कायली बोल्डीला घटस्फोट दिला.
केव्हिन पीटरसन या इंग्लंडच्या माजी खेळाडूने २०२१ मध्ये जेसिका टेलरशी घटस्फोट घेतला. तो आता समालोचन क्षेत्रात कार्यरत आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी अलीकडेच घटस्फोट घेतला. चार वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी १९९६ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न करण्यासाठी पत्नी नौरीनला घटस्फोट दिला.
२०१२ मध्ये दिनेश कार्तिकच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले. तेव्हा तो त्याची बालपणीची मैत्रिण निकिता वंजारापासून वेगळा झाला. तिचे कार्तिकचा सहकारी मुरली विजयसोबत अफेअर होते. कार्तिकने नंतर २०१५ मध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले.
शिखर धवनने २०२१ मध्ये लग्नाच्या आठ वर्षानंतर आयशा मुखर्जीला घटस्फोट दिला. अनेकदा धवनने आपल्या मुलाला भेटण्यासाठी खूप धडपड करावी लागते अशी खदखद व्यक्त केली आहे.