Join us  

हरमनप्रीत कौरच्या 'रन आऊट'वरून वाद, माजी कर्णधाराची टीका; समर्थनात उतरली अनुष्का शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 4:01 PM

Open in App
1 / 7

ICC महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी १७३ धावांचं लक्ष्य होतं, पण ते आठ विकेट गमावून १६७ धावाच करू शकले.

2 / 7

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रन आऊटवरून गदारोळ झाला होता. डावाच्या १५व्या षटकात दुसरी धाव घेण्यासाठी परतत असताना हरमनप्रीतची बॅट अडकली आणि अ‍ॅलिसा हिलीने भारतीय कर्णधाराला धावबाद केले. भारतीय महिला संघाची माजी कर्णधार डायना एडुल्जीने हरमनप्रीतवर या रन आऊटवर टीका केली.

3 / 7

डायना एडुल्जी म्हणाल्या, 'ती म्हणते की बॅट अडकली, परंतु जर तुम्ही दुसरी धाव पाहिली तर ती जॉगिंग करत होती असे दिसते. तुमची विकेट इतकी महत्त्वाची आहे, हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही ती सहज का देता? जिंकण्यासाठी तुम्हाला व्यावसायिक क्रिकेट खेळावे लागेल. एलिसा पेरीने डायव्हि मारून करून दोन धावा कशा वाचवल्या. हे व्यावसायिक क्रिकेट आहे.

4 / 7

एडुल्जी म्हणाल्या, 'ऑस्ट्रेलिया शेवटपर्यंत हार मानत नाहीत आणि आम्ही लढायला अजिबात तयार नाही. तुम्ही शेवटच्या क्षणी सामने गमावू शकत नाही. ती सहज पोहोचेल असे त्यांना वाटले. सुनील गावसकर यांनी 1970 च्या दशकात आम्हाला सांगितले होते की, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चेंडूवर धाव घेता तेव्हा तुम्हाला तुमची बॅट ग्राऊंड करायला शिकावे लागते, तरच तुम्हाला ती सवय जडता येईल. तिची बॅट चुकीच्या हातात होती.

5 / 7

हरमनप्रीत कौरने तिची रनआउट दुर्दैवी असल्याचे म्हटले. हरमप्रीत म्हणाली, 'जेमिमा रॉड्रिग्जसोबतच्या भागीदारीमुळे आम्ही लयीत आलो होतो. यानंतर आम्हाला हरण्याची अपेक्षा नव्हती. मी ज्या प्रकारे धावबाद झाली, त्यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही.

6 / 7

हरमनप्रीत कौर पुढे म्हणाली, 'पण कधी कधी क्रिकेटमध्ये असे घडते आणि जे घडते ते स्वीकारावे लागते. या संपूर्ण स्पर्धेत आमचा संघ ज्या प्रकारचा क्रिकेट खेळला त्यामुळे मी आनंदी आहे. रिचा घोषसारखे काही चांगले परफॉर्मन्स आम्ही पाहिले.

7 / 7

सेमीफायनल मॅचमध्ये भारताच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरचा एक फोटो समोर आला होता ज्यामध्ये ती काळ्या चष्म्यातील दिसत होती. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही तो फोटो शेअर करत लिहिले, 'तुझा आणि तुझ्या टीमचा नेहमीच अभिमान आहे.''

टॅग्स :हरनमप्रीत कौरअनुष्का शर्माट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App