भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या तिचा आगामी चित्रपट 'Chakda Xpress'च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. मुंबईपासून कोलकातापर्यंत अभिनेत्री शूटिंगसाठी सर्व ठिकाणी जात आहे. अलीकडेच तिची एक झलक कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पाहायला मिळाली. अनुष्काच्या या लूकची खूप चर्चा रंगली असून तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर अनुष्का निळ्या रंगाच्या भारतीय संघाच्या जर्सीत दिसली. या शूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनुष्का शर्मा कामात व्यस्त असल्याने घामाने भिजलेली दिसत आहे. एका फोटोमध्ये ती काही लोकांशी बोलतानाही दिसत आहे.
अनुष्का शर्मा भारताच्या जर्सीत फारच सुंदर दिसत असून तिने सर्व क्रिकेट वर्तुळाला आकर्षित केले आहे. चकडा एक्सप्रेस चित्रपटाबद्दल भाष्य करायचे झाले तर, या चित्रपटात अनुष्का शर्मा भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. माहितीनुसार, अनुष्का शर्माने काही महिन्यांपूर्वी शूटिंगचा पहिला भाग पूर्ण केला आहे आणि आता ती तिच्या शूटिंगच्या अंतिम टप्प्यात आहे.
अनुष्का शर्मा या भूमिकेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. मागील काही काळापासून ती अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर देखील दिसली आहे. खरं तर हा चित्रपट 2 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. दुसरीकडे भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. विराट कोहलीने अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकाच्या स्पर्धेत शानदार फलंदाजी केली होती. त्यामुळे आगामी विश्वचषकात त्याच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष असेल.
खरं तर अनुष्का शर्मा ईडन गार्डनच्या स्टेडियमवर उन्हात शूटींग करताना दिसली. तिच्या हावभावावरून पाहायला मिळते की अनुष्का उन्हात घाम घाळून चित्रपटाची तयारी करत आहे. त्यामुळे तिचा आगामी चित्रपट तिच्या चाहत्यांसह क्रिकेट प्रेमींसाठी देखील आकर्षणाचा भाग असणार आहे. कारण झुलन गोस्वामी हे भारतीय महिला क्रिकेटमधील नामांकित नाव असून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी झुलन दिग्गज खेळाडू असल्याचे म्हटले होते.
अनुष्का शर्मा ज्या खेळाडूची भूमिका साकारत आहे त्या झुलन गोस्वामीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने इंग्लंडच्या धरतीवर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. इंग्लंडविरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने विजय मिळवून भारतीय संघाने झुलन गोस्वामीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.